अवश्य वाचा


  • Share

संगमनेर तालुक्यामध्ये आज पुन्हा 26 जणांना कोरोनाची बाधा शहरातील तीन तर ग्रामीण भागातील तेवीस जणांचा समावेश

दि. 18/09/2020 संगमनेर तालुक्यामध्ये आज पुन्हा 26 जणांना कोरोनाची बाधा शहरातील तीन तर ग्रामीण भागातील तेवीस जणांचा समावेश संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळविलेल्या कोरोनाने आजही ग्रामीण भागात 23 जणांना बाधित केले असून आज शहर व तालुक्याचे मिळून 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आज आलेल्या अहवालानुसार संगमनेर शहरातील जनता नगर येथील 45 वर्षीय महिला, मालदाड रोड येथील 04 वर्षीय बालिका व 23 वर्षीय तरुणी असा तीन जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहराला दिलासा मिळत असून ग्रामीण भागामध्ये आज तालुक्यातील जोर्वे येथे 40 वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथील 36 वर्षीय पुरुष, 34 व 30 वर्षीय महिला, बिरेवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, गुंजालवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, निमगाव बुद्रुक येथील 64 वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथील 69 वर्षीय वृद्ध, पोखरी हवेली येथील 62 वर्षीय महिला, ओझर खुर्द येथील 8 वर्षीय बालिका, 50, 55 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 27, 50 वर्षीय पुरुष, निमोण येथील 20 वर्षीय तरुण, पळसखेडे येथील 31 वर्षीय पुरुष, मालदाड येथील 50 वर्षीय महिला, कौठे बुद्रुक येथील 46 वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथील 66 वर्षीय वृद्ध, सावरगाव तळ येथील येथील 65, 13, 65 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुष असा तेवीस जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असा एकूण सव्वीस जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.