अवश्य वाचा


  • Share

संगमनेर तालुक्यामध्ये कोरोना हाटेना !!! आज पुन्हा 49 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह !

दि. 15/09/2020 संगमनेर तालुक्यामध्ये कोरोना हाटेना !!! आज पुन्हा 49 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह ! संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यातून कोरोना हटण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. कोरोना तालुक्यातून हटत नसल्याने गंभीर वातावरण असतानाच आज पुन्हा शहर व तालुक्यात मिळून 49 रुग्ण सापडले आहेत. आज आलेल्या अहवालामध्ये संगमनेर शहरातील मेन रोड येथील 75 वर्षीय वृद्धा, मोमीनपुरा येथील 40 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 18 वर्षे तरुण अभंग मला येथील 38 वर्ष इसम विद्यानगर येथील 55 वर्षे महिला पन्नास वर्षे पुरुष मालदाड रोड येथील 26, 46 वर्षे पुरुष जानकी नगर येथील 65 वर्षे पुरुष हे नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्याचबरोबर तालुका संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील 26 13 वर्षे महिला 34 41 59 वर्षीय पुरुष मनोली येथील 58 वर्षीय पुरुष घारगाव येथील 67 वर्षीय पुरुष पिंपळे येथील 55 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथील 32 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष, निमगाव टेम्भी येथील 60 वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथील 56 55 वर्षीय पुरुष, हिवरगाव पठार येथील 53 वर्षीय पुरुष, कासारा दुमाला येथील 42 वर्षीय पुरुष, वनकुटे येथील 48 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, मिर्झापुर येथील 10 वर्षीय मुलगा, पेमगिरी येथील 6 वर्षीय बालिका व 33 वर्षीय महिला, देवकौठे येथील 70 वर्षीय वृद्ध, 11 वर्षीय मुलगा, 34 वर्षीय महिला, आश्वि बुद्रुक येथील 18, 45, 65 वर्षीय महिला, मनोली येथील 52, 55 वर्षीय पुरुष, ओझर खुर्द येथिल 55 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय वृद्धा, जोर्वे येथील 35 वर्षीय महिला, गुंजळवाडी येथील 10, 20 वर्षीय तरुण, समनापूर येथील 55 वर्षीय महिला, साकुर येथील 65 वर्षीय महिला, मालूनजे येथील 32 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, निमोण येथील 52 वर्षीय पुरुष, आंबी दुमाला येथील 50 वर्षीय पुरुष असा चाळीस जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजची संख्या 49 झाली आहे.