दि. 15/09/2020 संगमनेर तालुक्यामध्ये कोरोनाची ढगफुटी !!! आज तब्बल 82 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह ! संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यातून कोरोना हटण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. त्यामध्ये आज तब्बल 82 जनांची भर पडून संगमनेर तालुक्यावर एक प्रकारे कोरोनाची ढगफुटी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून सगळीकडे चिंताजनक वातावरण पसरले आहे. आज संगमनेर शहरामध्ये 49 वर्षीय पुरुष, गणेशनगर येथील 40 वर्षीय महिला, पाबळे वस्ती येथील 42 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथील 34, 59 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय तरुणी, स्वामी कॉलनी येथील 52 वर्षीय महिला, जानकी नगर येथील 60 वर्षीय महिला, कुरण रोड येथील 50 वर्षीय महिला असे नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहराची संख्या जरी दिलासादायक असली तरी ग्रामीण भागातील संख्या चिंताजनक असून आज तालुक्यातील आश्वि खुर्द येथील 31 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, शिबलापूर येथील 15 वर्षीय मुलगी, निमोण येथील 08 वर्षीय बालक, 38, 49 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरूष, सोनेवाडी येथील 24, 52 वर्षीय महिला, पळसखेडे येथील 33 वर्षीय इसम, शिरापूर येथील 52 वर्षीय महिला, पेमगिरी येथील 68 वर्षीय वृद्ध, धांदरफळ खुर्द येथील 9, 26, 27, 50 वर्षीय महिला, 55, 59 वर्षीय पुरुष, सादतपुर येथील 18 वर्षीय तरुण, 16, 38 वर्षीय महिला, आश्वि बुद्रुक येथील 43 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथील 36 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 62 वर्षीय पुरुष, आंबी दुमाला येथील 60 वर्षीय पुरुष, पिंपरणे येथील 70 वर्षीय वृद्धा, घुलेवाडी येथील 25 वर्षीय तरुण, चंदनापुरी येथील 21 वर्षीय तरुण, खळी येथील 38 वर्षीय महिला, निळवंडे येथील 27 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 34 वर्षीय महिला, मुंजेवाडी येथील 45 वर्षीय महिला, झोळे येथील 27, 29 वर्षीय तरुण, 26, 49 वर्षीय महिला, साकुर येथील 3 वर्षीय बालक, 26, 40, 50, 60 वर्षीय पुरुष, 30, 28, 45 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 54, 61वर्षीय पुरुष, 12 वर्षीय बालिका, चिखली येथील 23 वर्षीय तरुनी, 21 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 43 वर्षीय पुरुष, कसारा दुमाला येथील 47 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथील 27, 25 वर्षीय तरुण, 46, 65, 32, 22 वर्षीय महिला, 70, 42 वर्षीय पुरुष, जोर्वे येथील 10 वर्षीय बालक, 28 वर्षीय तरुण 37 वर्षीय महिला, दिग्रस येथील 28 वर्षीय तरुण, सोनेवाडी येथील 63 वर्षीय पुरुष, सावरगाव तळ येथील 17, 50, 70 वर्षीय पुरुष, 45, 70 वर्षीय महिला, कौठे खुर्द येथील 22 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 25 वर्षीय तरुण असा एकूण त्रेहत्तर जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आजची एकूण संख्या 82 झाली आहे.