दि. 14/09/2020 संगमनेरचा कोरोना हटेना !!! आज पुन्हा चौसष्ट रुग्ण संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यातून कोरोना हटण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. त्यामध्ये आज पुन्हा 64 जनांची भर पडल्याने शहर व तालुक्यात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून सदतीस जणांचे, तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून शहरातील अवघ्या चार जणांसह ग्रामीण भागातील तेहतीस जणांना कोविडची लागण झाली आहे. या अहवालातून शहरातील रंगारगल्ली येथील 47 वर्षीय तरुण, मोमिनपुरा भागातील 36 वर्षीय महिला, मेनरोड वरील 59 वर्षीय इसम व इंदिरानगर परिसरातील तीस वर्षीय महिलेला कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच तालुक्यातील गुंजाळवाडीमध्ये कोविडचा उद्रेक झाला आहे. तेथील दोन कुटुंबातील सात जणांसह एकूण दहा जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात 50 वर्षीय इसमासह 28 वर्षीय व एकोणीस वर्षीय तरुण, 40, 35 व 24 वर्षीय महिला, तसेच 7, 5 व 4 वर्षांच्या दोन मुलांनाही संसर्ग झाला आहे. निमगाव जाळीतील 50 वर्षीय इसम, आश्वी बुद्रुक मधील तीस वर्षीय तरुण, कनोली येथील 23 वर्षीय तरुण, चिंचपूर मधील 75 वर्षीय व 70 वर्षीय महिलांसह 44 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 23 वर्षीय तरुण, ओझर खुर्द येथील 37 वर्षीय तरुण, समनापुर येथील 21 वर्षीय तरुण, शेडगाव मधील 21 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 35 वर्षीय तरुण, पठार भागातील साकुर मधील 65 वर्षीय महिला, वनकुटे येथील 19 वर्षीय तरुणी, जवळे कडलग मधील 39 वर्षीय महिला, वेल्हाळ्यातील 50 वर्षीय महिलेसह नऊ व सहा वर्षीय बालिका, संगमनेर खुर्द मधील 65 वर्षीय इसमासह 64 वर्षीय महिला, शिबलापुर मधील 38 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 65 वर्षीय महिला व चंदनापुरीतील 75 वर्षीय वयोवृद्धासह 17 वर्षीय तरुणी असे एकूण सदतीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यासोबतच रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील चव्हाणपूरा भागातील 47 वर्षीय महिलेचा एकमेव अहवाल पॉझिटिव आला आहे. याव्यतिरिक्त आजच्या चाचण्यांमधून शहरात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. ग्रामीण भागातील कौठे खुर्द, जवळे कडलग व सादतपुर मधून दोन पेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहेत. आजही शहरात केवळ 5 तर तालुक्यात 59 रुग्ण आढळून आले आहेत. रॅपिड अँटीजेन चाचणीतून सावरगाव तळ येथील 43 वर्षीय तरुण, अकलापुर येथील 39 वर्षीय तरुण, झोळे येथील 37 वर्षीय तरुण, कौठे खुर्द येथील 70 वर्षीय व 39 वर्षीय महिलांसह 14 वर्षीय बालिका, 42, 24, 18 वर्षीय तरुण, सादतपुर येथील 65 वर्षीय महिलेसह 47 24 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक मधील 67 व 63 वर्षीय इसम, मनोली मधील 26 व 16 वर्षीय तरुण, वडगाव पान मधील 39 वर्षीय तरुण, अंभोरे येथील 27 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 41 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 18 वर्षीय तरुणी, निमोण मधील 40 वर्षीय महिला, शिरापूर मधील 45 वर्षीय तरुण, तर जवळेकडलग मधील 52, 45, 19 व 15 वर्षीय महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजही तालुक्याच्या रुग्ण संख्येत 64 रुग्णांची नव्याने भर पडल्याने तालुक्यातील कोविड रुग्णसंख्येचा प्रवास अडीच हजारच्या टप्प्याकडे पुढे सरकताना 2 हजार 385 वर पोहोचला आहे.