अवश्य वाचा


  • Share

संगमनेर मध्ये आज कोरोनाच्या सोळा रुग्णाची भर ! आठवड्यातील सर्वात निचांकी संख्येने दिलासा

दि.१३/०९/२०२० संगमनेर मध्ये आज कोरोनाच्या सोळा रुग्णाची भर ! आठवड्यातील सर्वात निचांकी संख्येने दिलासा संगमनेर प्रतिनिधी संगमनेर शहर व तालुक्यात गेला आठवडाभर कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचे उच्चांक दिसून येत होते मात्र आठवड्यातील शेवटचा दिवस थोडा दिलासादायक ठरला असून ह्या आठवड्यातील सर्वात निचांकी संख्या आज आली आहे. आज संगमनेर शहर व तालुक्यात सोळा रुग्णाची भर पडली आहे. आठवडाभरातील रोजच्या बधितांच्या संख्येपेक्षा कमी असल्याने आज थोडासा दिलासा मिळाला आहे. आज आलेल्या अहवालामध्ये संगमनेर शहरातील गोविंद नगर येथील 43 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील पिंपरणे येथील 70 वर्षीय वृद्ध, निमगाव जाळी येथील 42 वर्षीय पुरुष, निमगाव टेंभी येथील 34 वर्षीय इसम, निमोण येथील 48 वर्षीय पुरुष, मनोली येथील 70 वर्षीय वृद्ध व 55 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथील 64 वर्षीय महिला, निळवंडे येथील 53 व 56 वर्षीय पुरुष, वनकुटे येथील 75 वर्षीय वृद्ध, कौठे बुद्रुक येथील 46 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 42 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 54 वर्षीय पुरुष, मंगळापूर येथील 23 वर्षीय तरुणी व 21 वर्षीय तरुण असा सोळा जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.