दि. 11/09/2020 संगमनेर मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताच आज पुन्हा सापडले 34 रुग्ण आजची एकूण संख्या 39 संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज संध्याकाळी आलेल्या अहवालाने त्यामध्ये 34 रुग्णांची भर पडली असून सकाळी आलेले 5 रुग्णांचे अहवाल मिळून आजची एकूण संख्या 39 झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा हा संसर्ग प्रवास जोरदार सुरूच आहे. आज आलेल्या अहवालामध्ये संगमनेर शहरातील पद्मनगर येथील 65 वर्षीय पुरुष, भरीतकर मळा येथील 45, 58 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथील 34 वर्षीय इसम, गणेश नगर येथील 30 वर्षीय महिला, गणेश नगर येथील 70 वर्षीय वृद्ध, सावता माळी नगर येथील 55 वर्षीय पुरुष, गिरीजाविहार कॉलनी येथील 32 वर्षीय महिला, 6 वर्षीय बालिका, रहमतनगर येथील 45 वर्षीय पुरुष, विद्या नगर येथील 61, 68 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला असे तेरा जणांना बाधा झाली आहे. तर तालुक्यातील घुलेवाडी येथील 17, 15, 17 वर्षीय तरुण, 55, 61 वर्षीय पुरुष, आश्वि खुर्द येथील 55 वर्षीय महिला, आश्वि बुद्रुक 28 वर्षीय तरुण, चिकणी येथील 65 वर्षीय महिला, साकुर येथील 42 वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथील 16 वर्षीय तरुण, ढोलेवाडी येथील 21, 25 वर्षीय तरुण, 40, 68 वर्षीय महिला, पोखरी हवेली येथील 50 वर्षीय महिला, देवकौठे येथील 65 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथील 50 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 62 वर्षीय पुरुष, जोर्वे येथील 41 वर्षीय पुरुष, ओझर खुर्द येथील 55 वर्षीय महिला असा एकवीस जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहार. तर आज सकाळी आलेल्या अहवालात पाच जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे आज एकूण एकोणचाळीस जणांना बाधा झाली आहे.