अवश्य वाचा


  • Share

तालुक्यात आज सकाळीच पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह !

दि. 12/09/2020 तालुक्यात आज सकाळीच पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह ! संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यता कोरोनाने धुमाकुळ घातला असून दिवसेंदिवस हि संख्या वाढतच आहे. रोज मोठमोठाले आकडे समोर येत आहेत. काल रात्री 25 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आज सकाळी पुन्हा 5 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता ग्रामीण भागात काही विशेष काही उपाययोजना केल्या जाणार का याकडे लक्ष लागले आहे. आज सकाळी आलेल्या अहवालामध्ये शहरालगत असणार्‍या गुंजाळवाडी येथील 37 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 75 वर्षीय वृध्दा ढोलेवाडी येथील 48 वर्षीय पुरुष आणि कौठे बुद्रुक येथील 62 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला असे पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज आलेले सर्व अहवाल हे खाजगी प्रयोगशाळेकडून आलेले आहेत.