दि. 11/09/2020 संगमनेर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आज पुन्हा सापडले 25 रुग्ण घुलेवाडी येथे आज 7 रुग्ण संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असून आजही त्यामध्ये 25 रुग्णांची भर पडली असून एकट्या घुलेवाडी मध्ये तब्बल 7 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाचा हा प्रवास जोरदार सुरूच आहे. आज आलेल्या अहवालामध्ये संगमनेर शहरातील रंगार गल्ली येथील 22, 42 वर्षीय महिला, चैतन्य नगर येथील 32 वर्षीय इसम, कोल्हेवाडी रोड येथील 09 वर्षीय मुलगा, 84 वर्षीय वृद्ध, 24 वर्षीय तरुण, 34 वर्षीय महिला असे सात रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील 70 वर्षीय वृद्ध, 65 वर्षीय वृद्ध, आश्वि खुर्द येथील 55 वर्षीय महिला, गुंजाळवाडी 57 वर्षीय पुरुष, धांदरफळ खुर्द येथील 53 वर्षीय महिला, घारगाव येथील 48 वर्षीय पुरुष, कौठे कमळेश्वर येथील 26 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 40 वर्षीय पुरुष, मंगळापूर येथील 67 वर्षीय वृद्ध, 55 वर्षीय महिला, चिखली येथील 50 वर्षीय महिला असे अकरा रुग्ण सापडले आहेत. तर आज घुलेवाडीत कोरोनाने आपला मोर्चा वळवत तब्बल 7 जणांना बाधित केले आहे. यामध्ये 46, 48, 30 वर्षीय महिला, 06 वर्षीय बालिका, 10 वर्षीय मुलगा, 37 व 49 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. त्यामुळे आज एकूण पंचवीस जणांना बाधा झाली आहे.