अवश्य वाचा


  • Share

संगमनेर तालुक्यात कोरोनाचा महापूर आजही सापडले तब्बल 79 रुग्ण ग्रामीण भागावर कोरोनाचा कब्जा

दि. 10/09/2020 संगमनेर तालुक्यात कोरोनाचा महापूर आजही सापडले तब्बल 79 रुग्ण ग्रामीण भागावर कोरोनाचा कब्जा संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा एखाद्या महापुरासारखा वाढतच असून आजही यामध्ये तब्बल 79 रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून ग्रामीण भागावर कोरोनाने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. आज आलेल्या अहवालामध्ये संगमनेर शहरातील गोविंद नगर येथील 31 वर्षीय इसम, मालदाड रोड येथील 43, 56 वर्षीय महिला, 46 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 33 वर्षीय महिला, ताजणे मळा येथील 48 वर्षीय महिला, चैतन्य नगर येथील 70 वर्षीय वृद्ध, 27 वर्षीय तरुण, पंपिंग स्टेशन परिसरातील 32 वर्षीय इसम, पेटकर हॉस्पिटल परिसरातील 40 वर्षीय पुरुष, जे.पी. रोड लष्मी चौक येथील 56 वर्षीय महिला, अकोले नाका येथील 76 वर्षीय वृद्ध असा बारा जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहराबरोबरच तालुक्यातील आश्वि खुर्द येथील 58 वर्षीय पुरूष, रहीमपूर 35 वर्षीय महिला, हसनापूर 36 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय बालिका, 29 वर्षीय महिला, सादतपुर येथील 15 वर्षीय मुलगी, 36 वर्षीय पुरुष, देवकौठे येथील 8 वर्षीय मुलगा, 39 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 60 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 33 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 59 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, धांदरफळ बुद्रुक येथील 22 वर्षीय तरुण, 76 वर्षीय वृद्धा, मंगळापूर येथील 75 वर्षीय वृद्ध, 70 वर्षीय वृद्धा, 16 वर्षीय तरुणी, जवळे कडलग येथील 41 वर्षीय पुरुष, चिकणी येथील 26 वर्षीय तरुणी, 62 वर्षीय पुरुष, 8 वर्षीय मुलगी, घुलेवाडी येथील 38 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा, 15 वर्षीय मुलगी, 42 वर्षीय पुरुष, सोनेवाडी येथील 45 वर्षीय महिला, कुरण येथील 23 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्द येथील 31, 82 वर्षीय पुरुष, 24, 35, 70 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 44, 80 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 34 वर्षीय महिला, चिखली येथील 66 वर्षीय पुरुष, खांजापूर येथील 30 वर्षीय महिला,कौठे मलकापूर येथील 25 वर्षीय तरुण, कौठे बुद्रुक येथील 38 वर्षीय महिला, साकुर येथील 32 वर्षीय इसम, वनकुटे येथील 27 वर्षीय तरुण, कौठे धांदरफळ येथील 20 वर्षीय तरुणी, 25 वर्षीय तरुण, 42 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 19, 20, 38, 70 वर्षीय महिला, 12, 18, 46, 64 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथील 50 वर्षीय पुरूष, जोर्वे येथील 26 वर्षीय तरुणी, निर्मल नगर गुंजाळवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथील 57 वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथील 44 वर्षीय पुरुष, बोटा येथील 23 वर्षीय तरुणी, अकलापूर येथील 26, 70 वर्षीय पुरुष, 22, 26, 24, 65, 70 वर्षीय महिला असा 67 जनांचा अहवाल पॉझिटि आला आहे. त्यामुळे आजची एकूण संख्या 79 झाली आहे.