दि. 09/09/2020 कोरोनाचा ग्रामिण भागाला विळखा संगमनेर - कोरोना महामारीने आता शहराचा फास काहिसा ढिला करून तो तालुक्यातील ग्रामीण भागात आवळला आहे. तालुक्यातील गावागावात, वाड्यावस्त्यावर कोरोनाच्या या महाभयंकर राक्षसाने आता थैमान घातले आहे. कोरोनाच्या या राक्षसाने ग्रामिण भागातील जनजीवन विस्कळित केले आहे. आज बुधवारी दिवसभरात तब्बल ७२ कोविड रूग्ण आढळून आले असून यातील बहुतेक रूग्ण हे ग्रामिण भागातील आहे. कोविडने आता २१ शेचा टप्पा ओलांडला असून रूग्ण संख्या २१५५ वर पोहचली आहे. खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या नऊ जणांच्या अहवालातून शहरातील मोमीनपुरा येथील 43 वर्षीय तरुण, नवीन नगर रोड परिसरातील 64 वर्षीय इसमासह 31 वर्षीय तरुण, बाजारपेठेतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालदाड येथील 52 वर्षीय इसमासह 51 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 50 वर्षीय महिला, चिखलीतील 54 वर्षीय महिला व कौठे धांदरफळ मधील 48 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. त्यासोबतच रॅपिड अँटीजेन चाचणीतून 21 जणांचे अहवाल पॉझिटिव आले असून त्यात सर्वच्या सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. या अहवालातून कवठे मलकापूर येथेही कोविडचा विषाणू पोहोचला असून तेथील 61 वर्षीय इसमासह 32 वर्षीय तरुण, चंदनापुरी येथील 43 व 39 वर्षीय तरुणांसह 42 व 19 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 36 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द मधील 41 वर्षीय महिला, कौठे धांदरफळ मधील 49 वर्षीय महिला, वडगाव पान मधील 68 वर्षीय इसम, कोल्हेवाडील 10 वर्षीय बालक व पाच वर्षीय बालिका, आश्वी खुर्द परिसरातील 65 ते 42 वर्षीय महिला, चनेगाव मधील 27 वर्षीय महिला, देवकौठे येथील 36 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 60 व 58 वर्षीय महिलांसह 42 वर्षीय तरुण, मंगळापुर मधील 40 व 26 वर्षीय महिला आदींचा समावेश आहे. यासोबतच आज शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून 42 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातून शहरातील सात जणांसह तालुक्यातील 35 जण संक्रमित असल्याचे समोर आले आहे. त्यात शहरातील मालदाड रोड परिसरातील तीस वर्षीय तरुण, इंदिरानगर परिसरातील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 54 वर्षीय महिला, माळीवाडा परिसरातील 20 व 19 वर्षीय तरुणी, स्वामी समर्थ नगर परिसरातील 31 वर्षीय महिलेसह सात वर्षीय बालक संक्रमित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर तालुक्यातील चिंचपूर येथील 90 वर्षीय वयोवृद्धासह 16 वर्षीय तरुणी, चिंचोली गुरव येथील 52 वर्षीय इसम, कनोली येथील 40 वर्षीय महिला, रहिमपुर येथील 40 वर्षीय तरुण, मनोली येथील 27 व 25 वर्षीय तरुणांसह 27 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 41 वर्षीय तरुण, चिखलीतील 58 व 48 वर्षीय इसमासह 16 व 18 वर्षीय तरुण, तसेच 40 व 21 वर्षीय महिला, खराडी येथील 50 व 45 वर्षीय महिलांसह 17 वर्षीय तरुण, जांबुत खुर्द येथील 49 वर्षीय इसम, कुरकुटवाडी येथील 38 वर्षीय महिला, चंदनापुरीतील 35 वर्षीय महिला कालेवाडी येथील 44 वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथील 48 वर्षीय महिला, चिकणी येथील 34 वर्षीय तरुण, साकुर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 48 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 42 वर्षीय महिलेसह 29 वर्षीय तरुण, देवगाव येथील 48 वर्षीय इसम व वाघापूर येथील 27 वर्षीय तरुण आदी 42 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय व खासगीप्रयोग शाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणी द्वारा तालुक्याच्या रूग्ण संख्येत आजही तब्बल 72 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची रुग्णसंख्येने बाधितांचे एकविसावे शतक ओलांडून 2 हजार 157 चा आकडा गाठला आहे.