दि. 08/09/2020 संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव !! आज पुन्हा सापडले 30 नवे रुग्ण !!! ! २६ ग्रामीण तर ४ शहरवासीय ! संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होतच असून मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव हा ग्रामीण भागात जास्त दिसून येत आहे. आज आलेल्या अहवाल पुन्हा 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये संगमनेर शहरातील 4 जनांचा समावेश आहे तर उर्वरित 26 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. आज आलेल्या अहवालामध्ये संगमनेर शहरातील गांधी चौक येथील 43 वर्षीय पुरुष, शिवाजी नगर येथील 54 वर्षीय पुरुष, गणेश नगर येथील 68 वर्षीय पुरुष, रहमत नगर येथील 30 वर्षीय इसम असा चार जनांचा तर संगमनेर तालुक्यातील रायते येथील 70 वर्षीय वृद्ध, 60 वर्षीय महिला, 13 व 11 वर्षीय मुली, घुलेवाडी येथील 29 वर्षीय महिला 62 वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, राजापूर येथील 07 महिन्याचे बालक, कासारा दुमाला येथील 40 वर्षीय महिला, पिंपळगाव देपा येथील 65, 70 वर्षीय वृद्ध, 35, 56 वर्षीय महिला, साकुर येथील 42 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा, 70 वर्षीय वृद्ध, गुंजाळवाडी येथे 80 वर्षीय वृद्ध, मंगळापूर येथे 30 वर्षीय इसम, कोल्हेवाडी येथे 39 वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ येथे 55 वर्षीय पुरूष, तळेगाव दिघे येथे 37, 50वर्षीय इसम, बोरबन येथे 67 वर्षीय वृद्धा, धांदरफळ खुर्द येथे 51 वर्षीय पुरुष, बोटा येथे 50 वर्षीय महिला असा 26 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजची एकूण संख्या 30 झाली आहे. दरम्यान संगमनेर शहरापेक्षा तालुक्यातील खेडेगावांमध्ये प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.