दि. 07/05/2020 संगमनेर मध्ये कोरोनाचा प्रभाव वाढतच !! आज दोन मृत्यू तर नवीन 52 जणांना बाधा संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत नसून मागील चार दिवसात कोरोनाने पुन्हा जोरदार मुसंडी घेतली आहे. त्यामध्ये आज मोठी भर पडली असून 52 जणांना बाधा झाली आहे तर दुर्दैवाने दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असले तरी मात्र नागरिक बेशिस्त वागणे सोडत नाहीयेत. आज आलेल्या अहवालानुसार संगमनेर शहरातील बाजारपेठ येथील 55 वर्षीय महिला, कोष्टी गल्ली येथील 45 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, पंपिंग स्टेशन परिसरातील 34 वर्षीय इसम, रंगार गल्ली येथील 58 वर्षीय पुरुष, माळीवाडा येथील 27 वर्षीय तरुण असा सहा जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहराबरोबरच तालुक्यात कोरोनाचा प्रभाव जास्त दिसून येत असून आज चंदनापुरी येथील 05, 14 वर्षीय मुले, 16 वर्षीय तरुणी, 38, 60 वर्षीय महिला व 49, 52, 65वर्षीय पुरुष, पिंपळगाव देपा येथील 37 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 55 वर्षीय महिला, 09 वर्षीय मुलगा, 26, 27,50, 70, 73 वर्षीय पुरुष, राजापूर येथील 51 वर्षीय पुरुष, कुरकूटवाडी येथील 60 वर्षीय महिला, मांडवे बुद्रुक येथील 48 वर्षीय पुरुष, साकुर येथील 42, 60 वर्षीय पुरुष, मंगळापूर येथील 38, 62, 68 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, नान्नज येथील 29 वर्षीय तरुण, पेमगिरी येथील 29 वर्षीय तरुण, 21 वर्षीय तरुणी, कासारा दुमाला येथील 23 वर्षीय तरुणी, बोटा येथील 11 वर्षीय मुलगा, सुकेवाडी येथील 28 वर्षीय तरुण, अंभोरे येथील 17 वर्षीय तरुणी, चिंचपूर येथील 65, 70 वर्षीय वृद्ध, 27 वर्षीय तरुण, 22 वर्षीय तरुणी, आंबी दुमाला येथील अवघ्या 8 महिन्याची बालिका, 21, 24 वर्षीय तरुणी, 31 वर्षीय इसम, 47 वर्षीय महिला, सावरगाव तळ येथील 48 वर्षीय पुरुष, कौठे बुद्रुक येथील 25, 36 वर्षीय तरुण, 22, 14 वर्षीय तरुणी असा 46 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजची एकूण संख्या 52 झाली आहे. आज झालेल्या दोन जणांच्या मृत्यूमुळे मयतांची संख्या 29 झाली आहे.