अवश्य वाचा


  • Share

संगमनेर मध्ये कोरोना थांबता थांबेना !! आज पुन्हा 40 रुग्णांची भर दोन हजाराचा टप्पा पार ! आज गुंजाळवाडीत कोरोनाचा उद्रेक

दि. 06/05/2020 संगमनेर मध्ये कोरोना थांबता थांबेना !! आज पुन्हा 40 रुग्णांची भर दोन हजाराचा टप्पा पार ! आज गुंजाळवाडीत कोरोनाचा उद्रेक संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाने घातलेला धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नसून मागील दोन दिवसात 146 रुग्ण सापडल्यानंतर आज पुन्हा 40 जणांना बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच शहरालगत असणाऱ्या गुंजाळवाडी मध्ये आज तब्बल 15 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तेथे भीतीचे वातावरण पसरले आहे. आज आलेल्या अहवालानुसार संगमनेर शहरातील नवीन नगर रोड येथील 52 वर्षीय पुरुष, माळीवाडा येथील 63 वर्षीय पुरुष, पाटील मळा रोड येथील 29 वर्षीय तरुण, मालपाणी लॉन्स परिसरातील 73 वर्षीय वृद्धा, शिवाजी नगर येथील 06 वर्षीय बालक, सावता माळी नगर येथील 45 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 34 वर्षीय महिला आणि गणेशनगर येथील 56 वर्षीय महिला असा आठ जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तसेच शहराबरोबर तालुक्यातील जाखुरी येथील 55 वर्षीय महिला, दाढ बु येथील 22 वर्षीय तरुण, अलकापूर येथील 51 वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथील 79 वर्षीय वृद्ध, चिखली येथील 76 वर्षीय वृद्धा, 32 वर्षीय इसम, कासारे येथील 57 वर्षीय पुरुष, नांदुरी दुमाला येथील 29 वर्षीय तरुण, सुकेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथील 37 वर्षीय इसम, येथील 31 वर्षीय इसम, रायते येथील 50 वर्षीय महिला व 17 वर्षीय तरुण, कौठे धांदरफळ येथील 34, 60 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, खराडी येथील 48 वर्षीय पुरुष आणि गुंजाळवाडी येथील 41 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय मुलगा, 04, 11, 13, 13,14, 17, 17 वर्षीय मुली व 35, 36, 36, 37, 56, 50 वर्षीय महिला असा 32 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे आजची संख्या चाळीस झाली असून आता तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येने 2000 चा टप्पा पार केला आहे.