दि. 27/08/2020 संगमनेरला कोरोनाने झोडपले !! आज पुन्हा 42 जणांना बाधा संगमनेर प्रतिनिधी संगमनेर शहर व तालुक्याला कोरोनाने आपला विळखा जोरदार कसला असून मागील 3 दिवसात मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन तालुक्याला झोडपून काढले आहे. कोरोनाबधितांच्या संख्येत वाढ होण्याचा सिलसिला वाढतच असून आज पुन्हा त्यात 42 जणांची भर पडली आहे. त्यामुळे सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. आज संध्याकाळी आलेल्या अहवालानुसार संगमनेर शहरातील शिवाजीनगर येथील 34, 55 व 61 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथील 64 वर्षीय पुरुष, स्वामी समर्थ नगर येथील 40 वर्षीय पुरुष, उपासनी गल्ली येथील 15 वर्षीय मुलगा व 35 वर्षीय महिला, गणेश नगर येथील 34 वर्षीय महिला, पावबाकी रोड येथील 64 वर्षीय पुरुष आणि वड गल्ली येथील 45 वर्षीय महिला असा दहा जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील कौठे कमलेश्वर येथील 24 वर्षीय तरुण, आभाळवाडी येथील 29 वर्षीय तरुण, बोटा येथील 31, 34, 36 व 65 वर्षीय पुरुष व 16, 24, 27 वर्षीय तरुणी, चंदनापुरी येथील 7 व 13 वर्षीय मुलगा, 3 वर्षीय चिमुकली, 26, 24, 25, 36 व 40 वर्षीय महिला आणि 32 वर्षीय इसम, शिबलापूर येथील 20, 42 वर्षीय पुरुष, पानोडी 27 वर्षीय तरुण, सोनेवाडी येथील 59 वर्षीय पुरुष, केशवनगर गुंजाळवाडी येथील 05 वर्षीय बालक, 27 वर्षीय तरुणी, निमोण येथील 52 वर्षीय पुरुष, जोर्वे येथील 57 वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ येथील 55 वर्षीय पुरुष, कनोली येथील 50 वर्षीय पुरुष, जाखुरी येथील 36 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 80 वर्षीय वृद्ध, 38 वर्षीय इसम आणि हिवरगाव पावसा येथील 45 वर्षीय पुरुष असा बत्तीस जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजची संख्या 42 झाली आहे.