अवश्य वाचा


  • Share

संगमनेरला कोरोनाचा पुन्हा दणका !! 24 तासात तब्बल 65 कोरोनाबाधितांची वाढ

दि. 27/08/2020 संगमनेरला कोरोनाचा पुन्हा दणका !! 24 तासात तब्बल 65 कोरोनाबाधितांची वाढ संगमनेर (प्ररीनिधी) संगमनेर शहर व तालुक्याला कोरोनाने जोरदार दणका दिला असून मागील 24 तासांमध्ये तब्बल 65 नवीन रुग्णांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काल रात्री उशिरा आलेल्या व आज सकाळीच आलेल्या अहवालानुसार ही रुग्णसंख्या आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्याने कोरोनाबधितांचा दिड हजारांचा टप्पा पार केला असून एकूण संख्या 1515 झाली आहे. तसेच सध्या 206 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 27 जणांनी आपला जीव गमावला आहे. खाजगी प्रयोग शाळेच्या अहवालानुसार शहरातील गिरीजाविहार येथील 64 वर्षीय पुरुष, वकील कॉलनी येथील 54 वर्षीय पुरुष, नेहरू चौक येथील 48 वर्षीय पुरुष, रहमतनगर येथील 70 वर्षीय वृद्ध, इंदिरानगर येथील 41, 46 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, स्वामी समर्थ नगर येथील 68, 69 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, गणेशविहार कॉलनी येथील 56 वर्षीय पुरुष, श्रीराम कॉलनी येथील 57 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, नवीन नगर रोड येथील 56 वर्षीय पुरुष, तर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील 27 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 72 वर्षीय वृद्ध, घुलेवाडी येथील 30, 55 वर्षीय पुरुष व 69 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथील 35 वर्षीय महिला, साकुर येथील 41 वर्षीय पुरूष, निमगाव जाळी येथील 32 वर्षीय पुरुष असा बावीस जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर अँटीजन टेस्टमधून आलेल्या अहवालानुसार शहरातील जनतानगर येथील 19, 26, 48 वर्षीय महिला, खंडोबा गल्ली येथील 36 वर्षीय पुरुष व 58 वर्षीय महिला, साळीवाडा येथील 78 वर्षीय वृद्ध, चैतन्य नगर येथील 65 वर्षीय महिला, माळीवाडा येथील 26, 55, 60 वर्षीय महिला, उपासनी गल्ली येथील 75 वर्षीय वृद्धा तर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, 8 वर्षीय बालक, 16 वर्षीय तरुणी, 43 वर्षीय महिला, कुरकूटवाडी येथील 46 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 37, 49 वर्षीय पुरुष 2 वर्षीय बालिका, 33, 34 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 21 वर्षीय तरुण व 27 वर्षीय तरुणी, मेंढवन येथील 30 वर्षीय महिला व 34 वर्षीय पुरुष, गोरक्षवडी येथील 28, 34, 68 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालिका, चिकणी येथील 53 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, रहिमपूर येथील 65 वर्षीय महिला व 11 वर्षीय बालिका, राजापूर येथील 21 दिवशीय चिमुकलीला बाधा झाली आहे, संगमनेर खुर्द येथील 32 वर्षीय पुरुष, निमगाव टेंभी येथील 26 वर्षीय तरुण, 02 वर्षीय बालक व 02 बालिका, पानोडी येथील 20 व 65 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, 50 व 57 वर्षीय महिला असा 43 जनांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे एकूण संख्या 65 झाली आहे.