अवश्य वाचा


  • Share

संगमनेर तालुक्यात आज पुन्हा बावीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

दि. 24/08/2020 संगमनेर तालुक्यात आज पुन्हा बावीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यात कोरोनाच्या संख्येत आज पुन्हा नव्याने 22 रुग्णांची भर पडली आहे. अँटीजन टेस्टच्या माध्यमातुन आजचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या अहवालामध्ये संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील 65 व 40 वर्षीय पुरुष, आणि 62 वर्षीय महिला, आश्वि खुर्द येथील 8 वर्षीय बालक, 30 व 75 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय तरुणी आणि 50 वर्षीय महिला, कुरकूटवाडी येथील 22, 32, 62, 69 वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथील 47 व 30 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथील 72 वर्षीय वृद्ध, राजापूर येथील 25 वर्षीय तरुण, चिकणी येथील 7 वर्षीय बालक, 36 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 45 वर्षीय महिला, वडगाव पण येथील 03 वर्षीय बालक व 32 वर्षीय इसम आणि कोल्हेवाडी येथील 49 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजची संख्या बावीस झाली आहे