अवश्य वाचा


  • Share

संगमनेर मध्ये आज पुन्हा 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह खाजगी प्रयोगशाळेतील पंधरा तर अँटीजन टेस्टचे चौदा पॉझिटिव्ह

दि. 22/08/2020 संगमनेर मध्ये आज पुन्हा 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह खाजगी प्रयोगशाळेतील पंधरा तर अँटीजन टेस्टचे चौदा पॉझिटिव्ह संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहरातील कोरोना संकट अजूनही कायम असून आज शहरात पुन्हा 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये खाजगी प्रयोगशाळेतील पंधरा तर अँटीजन टेस्टचे चौदा अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. आज आलेल्या अहवालानुसार शहरातील अभिनव नगर येथील 27 वर्षीय महिला, खंडोबा गल्ली येथील 50 वर्षीय पुरुष, संतोषी माता नगर येथील 28 वर्षीय तरुण, वाद गल्ली येथील 47 वर्षीय पुरुष, कुरण रोड येथील 72 वर्षीय वृद्ध, विद्या नगर येथील 64 वर्षीय पुरुष, देवाचा मळा येथील 32 वर्षीय इसम, कुंभार गल्ली येथील 31 वर्षीय इसम, जनता नगर येथील 42 वर्षीय महिला, इंदिरानगर येथील 30 वर्षीय इसम, घोडेकर मळा येथील 02 व 05 वर्षीय बालके यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील 55 वर्षीय पुरुष, पिंपळे येथील 51 वर्षीय पुरुष, शिबलापूर येथील 42 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथील 62 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 58, 75, 24, 18 वर्षीय पुरुष व 46, 75, 38 वर्षीय महिला, चिकणी येथील 45 वर्षीय पुरुष, सोनूशी येथील 54 वर्षीय पुरुष, आश्वि खुर्द येथील 30 वर्षीय इसम, खांबे येथील 27 वर्षीय तरुण, मनोली येथील 59 वर्षीय पुरुष असा एकूण 29 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर अकोले तालुक्यातील चीतळवेढे येथील 30 वर्षीय इसमाचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.