अवश्य वाचा


  • Share

संगमनेर मध्ये आज तर 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 27 जणांना डिस्चार्ज

दि. 21/08/2020 संगमनेर मध्ये आज तर 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 27 जणांना डिस्चार्ज संगमनेर प्रतिनिधी संगमनेर शहरातील व तालुक्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज पुन्हा त्यामध्ये तेरा ने भर पडली आहे. आज आलेल्या खाजगी प्रयोगशाळेतील अहवालातून पाच तर अँटीजन टेस्टमधील आठ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आज अखेर 1310 जनांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान आज 27 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. दरम्यान सद्यस्थितीत फक्त 127 जणांवर उपचार चालू आहेत. तर 1158 जणांनी कोरोनावर मत केली आहे आणि 25 जणांनी आपला जीव गमवला आहे. आज आलेल्या अहवालानुसार शहरातील अभिनव नगर येथील 33 वर्षीय इसम, पोफळे मळा येथील 22 वर्षीय तरुणी, घोडेकर मळा येथील 34 वर्षीय इसम व 30 वर्षीय महिला, साळीवाडा येथील दोन 17 वर्षीय तरुण आणि तालुक्यातील वडगाव पान येथील 65 वर्षीय पुरुष, साकुरी येथील 47 वर्षीय पुरुष, कसारा दुमाला येथील 52 वर्षीय पुरूष, घुलेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, कुरकूटवाडी येथील 21 वर्षीय तरुणी व 65 वर्षीय पुरुष आणि राजापूर येथील 39 वर्षीय इसम असा तेरा जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.