अवश्य वाचा


  • Share

दि. 17/08/2020 संगमनेर मध्ये आज एक जनाचा मृत्यू तर 25 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह चिंचोली गुरवला कोरोनाचा घेराव खाजगी प्रयोगशाळेतील तीन तर अँटीजन टेस्टचे 22 अहवाल पॉझिटिव्ह

दि. 17/08/2020 संगमनेर मध्ये आज एक जनाचा मृत्यू तर 25 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह चिंचोली गुरवला कोरोनाचा घेराव खाजगी प्रयोगशाळेतील तीन तर अँटीजन टेस्टचे 22 अहवाल पॉझिटिव्ह संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात कोरोना झपाट्याने वाढतच असून सध्यातरी थांबण्याचे कुठलेही लक्षण दिसून येत नाहीये. कोरोनाने घातलेल्या या धुमाकूळा मध्ये आज पुन्हा नव्याने 25 जणांची भर पडली आहे. तर शहरातील कुंभार आळा येथील जेष्ठ नागरिकाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज आलेल्या खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालामध्ये तीन जनांचा तर अँटीजन टेस्टच्या माध्यमातून 22 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खाजगी प्रयोगशाळे च्या अहवालानुसार आज शहरातील 51 वर्षीय महिला, रंगार गल्ली येथील 20 वर्षीय तरुण आणि तालुक्यातील सुकेवाडी येथील 55 वर्षीय महिला असा तीन जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या अँटीजन टेस्टच्या माध्यमातून आलेल्या अहवालानुसार शहरातील साळीवाडा येथील 58 वर्षीय महिला व 62 आणि 31 वर्षीय पुरुष, गोल्डन सिटी येथे 20 वर्षीय तरुण, गणेश नगर येथील 54 वर्षीय महिला असा पाच जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे 20 वर्षीय तरुण, हंगेवाडी येथे 70 वर्षीय वृद्ध, कनोली येथे 50, 35 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला व 15 वर्षीय मुलगा, बोटा येथील माळेवाडी मधील 31 वर्षीय तरुण, चंदनापुरी येथील 23 वर्षीय तरुणी, निमोण येथील 50 वर्षीय महिला, तर आज तालुक्यातील चिंचोली गुरव मध्ये कोरोनाने धुमाकूळ घालत आठ जणांना बाधित केले असून यामध्ये 90 वर्षीय वृद्ध, 38, 45, 35 वर्षीय पुरुष, 60, 35 वर्षीय महिला, 12 व 16 वर्षीय मुलांचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अठरा जनांचा अहवाल सतरा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजची एकूण संख्या 25 झाली आहे. दरम्यान संगमनेर शहरातील आज झालेला जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत तालुक्यात 23 जनांचा मृत्यू झाला आहे.