दैनिक युवावार्ता अपडेटस् दि. 14/08/2020 संगमनेर मध्ये आज पुन्हा 38 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह खाजगी प्रयोगशाळेतील नऊ तर अँटीजन टेस्टचे एकोणतीस अहवाल पॉझिटिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा साडेअकराशे संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात कोरोना झपाट्याने वाढतच असून सध्यातरी थांबण्याचे कुठलेही लक्षण दिसून येत नाहीये. कोरोनाने घातलेल्या या धुमाकूळा मध्ये आज पुन्हा नव्याने 38 जणांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 1153 वर जाऊन पोहचला आहे. आज आलेल्या खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालामध्ये नऊ जनांचा तर अँटीजन टेस्टच्या माध्यमातून 29 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खाजगी प्रयोगशाळे च्या अहवालानुसार आज शहरातील विजय नगर येथील 50 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 32 वर्षीय पुरुष, जानकी नगर येथील 51 वर्षीय महिला, अभंगमळा येथील 42 वर्षीय महिला आणि संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील 59 वर्षीय महिला, कौठे कपालेश्वर येथील 54 वर्षीय पुरुष, आश्वि बुद्रुक येथील 55 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथील 34 वर्षीय इसम व वडझरी येथील 31 वर्षीय तरुण असा नऊ जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या अँटीजन टेस्टच्या माध्यमातून आलेल्या अहवालानुसार शहरातील मोमीन पुरा येथील 57 वर्षीय पुरुष, भारत नगर येथील 15 वर्षीय मुलगा व 49 वर्षीय महिला, गणेश नगर येथील 75 वर्षीय वृद्ध, 16 व 21 वर्षीय तरुण, 25 वर्षीय तरुणी, इंदिरा नगर येथील 53 वर्षीय महिला, घोडेकर मळा येथील 19 वर्षीय तरुणी, पावबाकी रोड येथील 52 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय तरुण, मोमीनपुरा येथील 58 वर्षीय पुरुष असा अकरा जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील जवळे कडलग येथील 58 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथील 17 वर्षीय तरुणी, राजापूर येथील 33 वर्षीय महिला, बोटा येथील 75 वर्षीय वृद्ध, मोधळवाडी येथील 26 वर्षीय तरुणी व 3 वर्षाची बालिका, निमोण येथील 65, 36, 50 वर्षीय पुरुष, 60, 31, 42 वर्षीय महिला, 4 वर्षीय दोन व अवघ्या 3 महिन्याची बालिका, 10 वर्षाची मुलगी, ढोलेवाडी येथील 65 वर्षीय महिला असा अठरा जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजची एकूण संख्या 38 झाली आहे. दरम्यान संगमनेर मध्ये 21 ते 40 वर्ष वयोगटाला कोरोनाची बाधा सर्वात जास्त झाल्याचे दिसून आले आहे. सध्या 180 जणांवर उपचार सुरू आहेत.