दि. 13/08/2020 संगमनेर तालुक्यात आज पुन्हा १९ जणांना बाधा खाजगी प्रयोगशाळेतील सात तर अँटीजन टेस्टच्या माध्यमातून 12 अहवाल पॉझिटिव्ह दीड वर्षाच्या चिमुरडीलाही बाधा संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात कोरोना थांबण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल 29 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज पुन्हा 19 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 7 जणांचे अहवाल हे खाजगी प्रयोगशाळेतून आले आहेत तर उर्वरित अहवाल अँटीजन टेस्टच्या माध्यमातून आले असून यात एका दिड वर्षीय चिमुरडीचाही समावेश आहे. आज आलेल्या खाजगी प्रयोगशाळेतील अहवालानुसार शहरातील इंदिरानगर येथील 59 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील 31 वर्षीय पुरुष, जनता नगर येथील 72 वर्षीय वृद्धा, पावबाकी रोड येथील 45 वर्षीय महिला, गणेश नगर येथील 42 वर्षीय महिला आणि तालुक्यातील निमोण येथील 39 वर्षीय इसम व राजपूर येथील 32 वर्षीय महिला असा 7 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आज घेण्यात आलेल्या अँटीजन टेस्ट मधून शहरातील भारत नगर येथील 59 वर्षीय पुरुष, सय्यद बाबा चौक येथील 62 वर्षीय पुरुष, खंडोबा गल्ली येथील 16 वर्षीय तरुणी, 35 व 66 वर्षीय महिला, घोडेकर मळा येथील 48 वर्षीय महिला व 28 वर्षीय तरुण आणि तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील 30 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 25 वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथील 45 वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथील 49 वर्षीय महिला व दीड वर्षीय बलिका असा 12 जनांचा समावेश आहे. आत्तापर्यंत 1114 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 495 रुग्ण हे शहरातील आहेत तर 619 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तसेच आत्तापर्यंत 883 जनांनी कोरोनावर मात केली आहे तर 22 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. सद्यस्थितीत 209 जणांवर उपचार सुरू आहेत.