अवश्य वाचा


  • Share

संगमनेर तालुक्यात आज पुन्हा ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह. खाजगी प्रयोगशाळेतील आठ तर अँटीजन टेस्टच्या माध्यमातून ३१ अहवाल पॉझिटिव्ह

दैनिक युवावार्ता अपडेटस् दि. 11/08/2020 संगमनेर तालुक्यात आज पुन्हा ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह खाजगी प्रयोगशाळेतील आठ तर अँटीजन टेस्टच्या माध्यमातून ३१ अहवाल पॉझिटिव्ह संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्याला कोरोनाने विळखा घातला असून हा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. नवीन नवीन गावे आता कोरोनाच्या हिटलिस्टवर येऊ लागली आहेत. आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात संगमनेर शहर व तालुक्यात 39 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये 8 जणांचे अहवाल खाजगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झाले आहेत तर उर्वरित सर्व अहवाल अँटीजन टेस्ट चे आहेत. आज आलेल्या खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार शहरातील लालतारा हौ. सोसायटी मधील एक 63 वर्षीय महिला, जनता नगर येथील 68 वर्षीय महिला, कुंभार गल्ली येथील 49 वर्षीय महिला, स्वदेश हॉटेल परिसरातील 43 वर्षीय पुरुष व तालुक्यातील कुरण येथील 51 वर्षीय पुरुष, जोर्वे येथील 43 वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथील 58 वर्षीय महिला, बोटा येथील 69 वर्षीय पुरुष असा एकूण आठ जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजन टेस्टच्या माध्यमातून आलेल्या अहवालानुसार शहरातील विद्या नगर येथील 41 वर्षीय महिला, जनता नगर येथील 48 वर्षीय पुरुष, वाडेकर गल्ली येथील 52 वर्षीय पुरुष, ऋणानुबंध मंगल कार्यालय परिसरातील 45 वर्षीय पुरुष, पंपिंग स्टेशन परिसरातील 72 वर्षीय महिला, साळीवाडा येथील 76 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 86 व 48 वर्षीय पुरुष, अभंगमळा येथील 40 वर्षीय पुरुष, स्वातंत्र्य चौक येथील 48 वर्षीय पुरुष व शहरातील 52 वर्षीय पुरुष असा एकूण 11 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहराबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागात देखील कोरोना फोफावला असून आजच्या अहवालानुसार चंदनापुरी येथील 54 वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथील 34 व 62 वर्षीय महिला आणि 12 व 15 वर्षीय मुले, पिंपरणे येथील 43, 45 व 70 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 26 व 28 वर्षीय तरुण आणि 28 व 26 वर्षीय तरुणी, चिंचोली गुरव येथील 20 वर्षीय तरुण, 44 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 82 वर्षीय वृद्ध, ढोलेवाडी येथील 27 व 22 वर्षीय तरुण, चिखली येथील 48 वर्षीय इसम आणि निंभाळे येथील 58 वर्षीय पुरुष असा एकूण 20 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान आत्तापर्यंत शहर व तालुक्यात 1063 रुग्ण सापडले असून यामधील 601 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत तर 462 रुग्ण हे शहरातील आहेत. सद्यस्थितीत 214 जणांवर उपचार सुरू आहेत तर 22 जनांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.