अवश्य वाचा


  • Share

संगमनेर तालुक्यात सकाळी ४ तर सायंकाळी पुन्हा 18 जण पॉझिटिव्ह

दि. 10/08/2020 संगमनेर तालुक्यात सकाळी ४ तर सायंकाळी पुन्हा 18 जण पॉझिटिव्ह आज सोमवारी सकाळी आलेल्या खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार संगमनेर शहर व तालुक्यात चार जणांना कोरोनाची बाधा झाली. तर सायंकाळी पुन्हा एंटिजन टेस्ट च्या अहवालातून शहर व तालुक्यातील 18 जणांना कोविडचा संसर्ग झाल्याचे पुढे आले. या वाढत्या रूग्ण संख्येने तालुक्यातील कोरोना रूग्णांचा आकडा 1024 वर पोहचला आहे. सकाळी तालुक्यातील सुकेवाडी येथील ७४ वर्षीय पुरुष तल शहरातील वकील कॉलनी येथील ४५ वर्षीय पुरुष, मोगलपुरा येथील ३३ वर्षीय पुरुष, अभंग मळा ७४ वर्षीय महिला असा एकूण ४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सायंकाळी आलेल्या अहवालात शहरातील साळीवाडा येथील 45,60 वर्षीय महिला तल 3 वर्षीय बालीका तसेच 35 वर्षीय पुरुष बाधीत आढळून आला. विद्यानगर येथे 52 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 26 वर्षीय पुरूष, मोगलपुरा येथे 34 वर्षीय महिला, जनतानगर येथे 27 पुरूष, परदेशपुरा येथे 61,16 वर्षीय पुरुष, 35,9,16,14 वर्षीय महिला कोरोना पॉजीटीव्ह आढळून आले. तर तालुक्यातील ग्रामीण भागातील पिंपारणे येथे 50 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे 55 वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथे 40 वर्षीय पुरूष, वेल्हाळे येथे 65 वर्षीय पुरूष असे नवे 18 रुग्ण आढळून आले आहे. रुग्ण संख्या हजारच्या पुढे गेली असून म्रुत्युचा आकडा वाढुन 22 झाला आहे.