दि. 08/08/2020 *तळेगाव दिघे, पिंपळे सह संगमनेर शहर व तालुक्याला कोरोनाचा पुन्हा दणका* *आज ४५ जणांना कोरोनाची बाधा* संगमनेर प्रतिनिधी संगमनेर शहर व तालुक्यात हैदोस घालणाऱ्या कोरोनाने आज शहरासह तालुक्यातील तळेगाव दिघे, पिंपळे या गावांना चांगलाच दणका दिला असून आज खाजगी प्रयोगशाळा व अँटीजन टेस्ट च्या माध्यमातून आलेल्या अहवालानुसार एकूण 45 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज संध्याकाळी आलेल्या खाजगी प्रयोग शाळेच्या अहवालानुसार शहरातील जम जम कॉलनी येथील 60 वर्षीय पुरुष, जनता नगर येथील 35 वर्षीय महिला, साईनाथ चौक येथील 76 वर्षीय वृद्ध, इंदिरानगर येथील 44 वर्षीय महिला, राम नगर येथील 54 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 63 वर्षीय महिला कोरोना बाधीत आढळून आले. तर तालुक्यातील घुलेवाडी येथील 30, 25 व 56 वर्षीय पुरुष आणि 27 व 49 वर्षीय महिला, खांडगाव येथील 26 वर्षीय तरुणी असा 12 जणांचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच अँटीजन टेस्ट मधून संगमनेर शहरातील रंगार गल्ली येथील 40 वर्षीय पुरुष, इंदिरा नगर येथील 27 वर्षीय तरुण, रहाणे मळा येथील 32 वर्षीय इसम असे तीन तर तालुक्यातील घुलेवाडी येथील 14 वर्षीय मुलगा , 54 वर्षीय पुरुष आणि 40 वर्षीय महिला, कर्हे येथील 50 वर्षीय महिला, मालदाड येथील 22 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 66 व 33 वर्षीय महिला आणि 15 वर्षीय मुलगा असे आठ व यांच्यासोबतच आज तळेगाव येथे 10 तर पिंपळे येथील 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये तळेगाव येथील 57, 40, 31, 30, 40 वर्षीय पुरुष, 5 वर्षीय बालिका, 12 वर्षीय मुलगी, 90 वर्षीय वृद्धा, 52 व 32 वर्षीय महिला तर पिंपळे येथील 67, 69, 70, 48 वर्षीय पुरुष, 65, 59, 67, 62, 38 वर्षीय महिला आणि 12 व 13 वर्षीय मुली व 18 वर्षीय तरुणी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजची एकूण संख्या ही 45 झाली आहे. तालुक्यातील कोविड रूग्णांची संख्या हजार च्या घरात पोहचली असून हि वाढती संख्या चिंताजनक आहे.