संगमनेर मध्ये आज पुन्हा सोळा रुग्ण संगमनेर प्रतिनिधी covid-19 ने संगमनेर शहर व तालुक्यामध्ये धुमाकूळ घातला असून काल चाळीस जणांना बाधा झाल्यानंतर आज सायंकाळी आलेल्या अहवालानुसार खाजगी प्रयोगशाळेकडून तीन तर रॅपिड अँटीजन टेस्ट मधून 13 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज ची संख्या सोळा झाली आहे. आज आलेल्या खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार तालुक्यातील जोर्वे येथील 69 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथील 35 वर्षीय महिला, नान्नज येथील 63 वर्षीय महिला यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले . तसेच अँटीजन टेस्टच्या माध्यमातून आलेल्या अहवालानुसार शहरातील जनता नगर येथील 41 वर्षीय पुरुष, इंदिरा नगर येथील 26 वर्षीय तरुण व 50 वर्षीय इसम, मालदाड रोड येथील 26 वर्षीय तरुण, श्रमिक नगर येथील 32 वर्षीय इसम असे 5 जणांना तर तालुक्यातील घुलेवाडी येथील 26 वर्षीय तरुणी व 47 वर्षीय पुरुष, कासारा दुमाला येथील दिड वर्षीय चिमुकली, धांदरफळ खुर्द येथील 19 वर्षीय तरुणी, तळेगाव दिघे येथील 34 वर्षीय पुरुष, चिखली येथील 23 वर्षीय तरुणी व 54 वर्षीय महिला आणि कर्हे येथील 55 वर्षीय पुरुष असे एकूण 13 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आज एकूण 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आज 16 जणांना बाधा झाली आहे त्याबरोबरच आज एकूण 26 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत तालुक्यात 926 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामधील 750 जणांनी कोरोनावर मात केली असून 19 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सद्यस्थितीत 156 जणांवर उपचार सुरू आहेत. सध्या रुग्ण वाढीपेक्षा बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.