दैनिक युवावार्ता अपडेट दि. 06/08/2020 पाच महिन्याच्या बालिकेसह 40 जणांना कोरोनाची बाधा संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाने आपले वर्चस्व अबाधित ठेवलेले असुन आज दिवसभरात कोणताही रिपोर्ट आलेला नसताना आज सायंकाळी आलेल्या अहवालामध्ये एका पाच महिनेच्या बालिकेसह एकूण 40 जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये 8 जणांचे अहवाल हे खाजगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेले आहेत तर उर्वरीत अहवाल अँटीजेन टेस्टचे आहेत. आज आलेल्या अहवालामध्ये खाजगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार रहमत नगर येथील 49 वर्षीय महिला, जाणता राजा मार्ग येथील 45 वर्षीय पुरुष, श्रमीक नगर येथील 48 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथील 16 व 31 वर्षीय तरुण आणि 40 वर्षीय महिला तसेच तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील 58 वर्षीय महिला व आंबी खालसा येथील 42 वर्षीय पुरुष यांचा कोव्हीड रिपोर्ट पॉझिटव्ह आला आहे. तर मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आलेल्या अँटीजेन टेस्टच्या माध्यमातुन आलेल्या अहवालानुसार शहरातील मालदाड रोड येथील 55 वर्षीय महिला, रंगार गल्ली येथील 14 वर्षीय मुलगा, 24 वर्षीय तरुण, 38 व 72 वर्षीय पुरुष आणि 37 वर्षीय महिला, इंदिरा नगर येथील 65, 54, 30 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी व 11 वर्षीय मुलगा व उपासनी गल्ली येथील 50 वर्षीय पुरुष इसम असे शहरातील 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच संगमनेर तालुक्यातील नान्नज येथील 5 महिन्याच्या बालिकेसह 65 वर्षीय पुरुष, चिखली येथील 45 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 20, 20, 22, 22 तरुण, 23 वर्षीय तरुणी, 51 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथील 5 वर्षीय बालक, 8 वर्षीय बालिका, 30, 26, 29, 22 वर्षीय तरुणी, 47 वर्षीय महिला, 52 वर्षीय तरुण, 26, 30 वर्षीय तरुण, पोखरण येथील 1 वर्षीय बालिका व 24 वर्षीय तरुणी असा 21 जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. हे सर्व अहवालानुसार आज एकुण 40 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने कोरोनाचे वर्चस्व शहर व तालुक्यात अबाधित आहे.