दैनिक युवावार्ता ब्रेकींग दि. 05/08/2020 संगमनेर मध्ये आज एकूण 28 जणांना कोरोनाची बाधा तर कोरोनावर 39 जणांची यशस्वी मात संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात आजही कोरोनाचा प्रभाव दिसून आला असून आज दिवसभरात 28 जनांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याबरोबरच आज तालुक्यातील 39 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मत देत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला आहे. आज दुपारी आलेल्या खाजगी व जिल्हा रुग्णालयातील प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील इंदिरा नगर येथे 33 वर्षीय तरुण व 65 वर्षीय महिला, रंगार गल्ली येथील 46 वर्षीय इसम, घास बाजार येथील 54 वर्षीय इसम व गांधी चौक येथील 42 वर्षीय इसमास कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातुन आलेल्या अहवालातून तालुक्यातील निमोण येथील 42 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तर खाजगी प्रयोगशाळेतून कासारा दुमाला येथील 31 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आज दुपारपर्यंत एकूण 7 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तर आता संध्याकाळी आलेल्या अहवालामध्ये शहरातील जानकी नगर येथील 52 वर्षीय पुरुष, घोडेकर मळा येथील 35 वर्षीय पुरुष, इंदिरा नगर येथील 62 वर्षीय महिला व 48 वर्षीय पुरुष आणि खंडोबा गल्ली येथील 38 वर्षीय पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर तालुक्यातील आश्वि बुद्रुक येथील 20 वर्षीय तरुणी, निमज येथील 22 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 21 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 21 व 29 वर्षीय तरुण, मालुंजे येथील 34, 41 व 70 वर्षीय पुरुष, नान्नज येथील 28 वर्षीय तरुण, खराडी येथील 04 व 06 वर्षीय बालिका, 24 वर्षीय तरुणी, 28 वर्षीय तरुण आणि 46 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 24 वर्षीय तरुण, व वडगाव पान येथील 60 वर्षीय इसमाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजची एकूण संख्या 28 झाली असून कोरोनाबाधितांचा आकडा 900 च्या जवळ पोहचला आहे. संगमनेर तालुक्यातून आज 39 जणांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 869 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 708 रुग्णांनी यशस्वी मात केली आहे तर 19 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बरे होण्याचे प्रमाण हे 81.47% आहे. आता 142 जणांवर उपचार सुरू आहेत.