अवश्य वाचा


  • Share

संगमनेर मध्ये आज 7 जणांना कोरोनाची बाधा आता जिल्ह्यातील कोवीड हॉस्पिटलमधील उपब्ध बेडची संख्या मिळणार एका क्लिकवर

दि. 05/08/2020 संगमनेर मध्ये आज 7 जणांना कोरोनाची बाधा आता जिल्ह्यातील कोवीड हॉस्पिटलमधील उपब्ध बेडची संख्या मिळणार एका क्लिकवर संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाने आपला प्रभाव कायम ठेवला आहे. त्यामुळे शहरात व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात आजही भर पडली असून आज दुपारपर्यंत 7 जणांचे कोव्हीड रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. आज बुधवारी आलेल्या खाजगी व जिल्हा रुग्णालयातील प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील इंदिरा नगर येथे 33 वर्षीय तरुण व 65 वर्षीय महिला, रंगार गल्ली येथील 46 वर्षीय इसम, घास बाजार येथील 54 वर्षीय इसम व गांधी चौक येथील 42 वर्षीय इसमास कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातुन आलेल्या अहवालातून तालुक्यातील निमोण येथील 42 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तर खाजगी प्रयोगशाळेतून कासारा दुमाला येथील 31 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आज दुपारपर्यंत एकूण 7 जणांचा अहवाला पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या आता एका क्लिकवर कळणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी covidbed.ilovenagar.com हे पोर्टल सुरू केले आहे. तेथे नागरिकांना सर्वसाधारण वार्ड, आय सी यु कक्षातील उपलब्ध बेड आणि ऑक्सिजन कक्षातील उपलब्ध बेडस यांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांना कुठल्या हॉस्पीटल मध्ये बेडस उपलब्ध आहे हे कळल्याने त्यांचा वेळ वाचणार आहे आणि रुग्णाला वेळेत उपचारासाठी दाखल करणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काही दिवसांपूर्वी फेसबूक लाइव्ह कार्यक्रमात असे पोर्टल सुरू करणार असल्याची माहिती दिली होती.