दि. 04/08/2020 संगमनेर मध्ये आज आणखी 6 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आजची एकूण संख्या 23 संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून आज सायंकाळी आलेल्या अहवालानुसार शहर व तालुक्यातील 19 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये शहरातील 4 तर तालुक्यातील ग्रामीण भागातील 15 जणांचा समावेश होता. परंतु त्यामधील दोन व्यक्ती ह्या राहता तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे त्या संगमनेर तालुक्यातील ग्राह्य धरल्या गेल्या नाही. तर आता प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील आणखी 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये शहरातील ऑरेंज कॉर्नर येथील 46 वर्षीय इसम आणि इंदिरा नगर येथील 23 वर्षीय तरुण, 52 व 45 वर्षीय पुरुष आणि 41 व 49 वर्षीय महिलांचा समावेश आहे. आज अगोदर आलेल्या अहवालानुसार संगमनेर शहरात भरीतकर मळा येथे 61 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथील 63 वर्षीय पुरुष, देवी गल्ली येथील 55 वर्षीय पुरुष, अभिनव नगर येथील 68 वर्षीय महिला यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर तालुक्यातील ग्रामीण भागातील वेल्हाळे येथील 49 वर्षीय पुरुष, जोर्वे येथील 24 वर्षीय तरुण, कौठे बु।। येथील 42 वर्षीय पुरुष, खराडी येथील 28 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 25 वर्षीय तरुण, जांबुत खुर्द येथे पहिल्यांदाच 62, 64 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय तरुण व 60 वर्षीय महिला आणि निमोण येथे 54 वर्षीय इसम, 30, 20 वर्षीय तरुण व 48 वर्षीय महिला यांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. अगोदर आलेल्या अहवालातील आश्वि बु।। येथील 50 व 45 वर्षीय इसम असा उल्लेख असलेल्या व्यक्ती ह्या राहता तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे आजची एकूण संख्या 23 झाली आहे. दरम्यान राज्य व अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.