अवश्य वाचा


  • Share

संगमनेर मध्ये आज संध्याकाळी पुन्हा 8 कोरोना रुग्ण आजची एकुण संख्या 14

दि. 03/08/2020 संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर आज सकाळी 6 जणांना बाधा झाल्यानंतर आता आलेल्या अहवालात आणखी आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आजची एकूण संख्या चौदा झाली आहे. आता सापडलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर शहरातील नेहरू चौक येथील 52 वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील 42 व 69 वर्षीय पुरुष, ताजने मळा येथील 36 वर्षीय महिला, इंदिरा नगर येथील 60 व 35 वर्षीय महिला असे 6 तर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील 20 वर्षीय तरुणी व कनोली येथील 5 वर्षीय बालिका अश्या आठ जणांचा समावेश आहे. दरम्यान तालुक्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही दिलासादायक बाब आहे.