अवश्य वाचा


  • Share

संगमनेरात पुन्हा 18 रुग्णांची भर चार पोलिसांनाही कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेरात सुरु असलेला कोव्हीड 19 चा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. शासनाकडून विविध चाचण्या सुरु असुन या चाचण्यात अनेक रुग्ण पॉझिटीव्ह आढळून येत आहेत. शहर पोलीस ठाण्यातील कारागृहात 22 कैदी सापडल्यानंतर काही पोलीसांनाही कोरोनाची लागण झाली. रक्षण करतेच कोरोनाच्या जाळ्यात आडकत असल्याने शहरात भितीचे वातावरण आहे. दरम्यान आज शुक्रवारी पुन्हा एकदा संगमनेरात कोरोना कहर केला. यात शहरातील 13 तर तालुक्यात 5 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शहरातील रंगार गल्ली येथे तब्बल सहा जण कोरोना रुग्ण आढळून आले. यात 62, 29, 06 वर्षीय महिला व 05 महिन्याची बालिका तर 09 व 27 वर्षीय पुरुष यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर माळीवाडा येथे 32 वर्षीय पुरुष, 02 वर्षीय बालिका, मालदाड रोड येथील 30 वर्षीय महिला, पद्मानगर येथील 45 वर्षीय पुरुष, जनतानगर येथे 29 वर्षीय पुरुष व 31 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर पोलीस कॉलनी येथील 26 वर्षीय महिला कोरोना बाधीत आढळून आली. तर तालुक्यातील आश्‍वी खुर्द येथील 43 वर्षीय पुरुष, निंबाळे येथील 42 वर्षीय पुरुष, कनोली येथील 54 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 39 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. यात दोन महिला पोलीस व दोन पुरुष पोलीस अशा चार पोलीसांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे चारही पोलीस संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. हे सर्व अहवाल अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.