अवश्य वाचा


  • Share

महावितरणचा गलथान कारभार न सुधारल्यास कार्यालयावर ठिय्या आंदोलन - शिरीष मुळे

संगमनेर (प्रतिनिधी) महाविकास आघाडीच्या काळात ग्राहकांच्या मीटर रिडींग व वारंवार वीजेचा लपंडाव, बंद पडलेली मीटर, बिलांचा विस्कळीतपणा बाबत तक्रारी वाढतच असल्याने वीज वितरणाचा अनागोंदी भोंगळ कारभारामुळे भाजपा ठिय्या करणार असल्याचा इशारा उत्तर नगर जिल्हा व्यापारी जिल्हाध्यक्ष शिरीष मुळे दिला आहे. याबाबत प्रसिद्ध पत्रकात शिरीश मुळे म्हणाले की, मी गेली आठ वर्षे वीज वितरणाचे काम भाजपच्या वतीने करीत आहे. अधिकृत माहितीनुसार डिसेंबर 19 ते डिसेंबर 20 च्या महाभकास आघाडीच्या काळात, ग्राहकांच्या मीटर रिडींग व वारंवार विस्कळीत होण्याच्या तक्रारी वाढतच आहे. नुकत्याच मी घेतलेल्या माहितीनुसार, नवीन वीज जोडणी घेणार्‍या घरगुती व वाणिज्यिक जोडणीला मीटर शिल्लक नाहीत असे ठेवणीतले उत्तर मिळते. सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही मीटर नाही म्हणुन लाईट नाही. पुरुष वा आयाबहिनी मीटरसाठी चकरा मारून वैतागून जातात. दोन दोन महिने मीटर प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यात साहेबाला काही खाऊ पाहिजे की काय? अशी शंका ग्राहकाला येते. धक्कादायक बाब ही आहे की, गेल्या संपूर्ण वर्षात ज्यांची मीटर नादुरुस्त,जळलेली व बंद पडली आहेत, त्यांना मीटर बदलून, वर्षभरात मिळालेली नाही. इतकी ग्राहकांची अनास्था व दुरावस्था आहे. ज्या भाजपच्या सत्ताकाळात अतिरिक्त मीटर शिल्लक असायचे ते मीटर आता मिळणे दुरापास्त झाल्याचे अधिकारी कबुल करतात. मीटर विभागीय कार्यालय नगरवरून येथे पाठविण्यात येतात. याविषयी अधिक्षक अभियंता अहमदनगर यांचेकडे विचारणा केली असता सर्व माहिती घेतो व व्यवस्था करतो असे सांगितले. तर कार्यकारी अभियंता गोसावी यांनी मीटर उपलब्ध झाले की देतो असे छापील उत्तर दिले. ग्रामीण विभागाची अवस्था यापेक्षा अधिक गंभीर आहे. नवीन मीटर व नादुरुस्त मीटर लवकर बदली न झाल्यास वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा संगमनेर भाजपा तर्फे देण्यात आला आहे.