अवश्य वाचा


  • Share

कोरोनाची वाढ कायम, दोन दिवसांत ७९ रुग्णांची भर

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेरला कोरोनाचा जणू विळखाच बसला आहे. कमी होत असलेल्या संख्येमुळे व बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे संगमनेकरांना काहिसा दिलासा मिळत असतांनाच पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. गुरूवार(45)व शुक्रवारी (34) आलेल्या अहवालातून तालुक्यात 79 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून ती 5360 वर जाऊन पोहचली आहे. गुरूवारी आढळून आलेल्या 45 रूग्णांमध्ये शहरातील विविध भागातील 22 रूग्णांचा तर ग्रामीण भागातील 23 रूग्णांचा समावेश होता. गुरूवार नंतर शुक्रवारी रूग्णसंख्येत काहीशी घट झाली.तालुक्यात कोरोनाचा हा चढ-उतार जणू नित्याची बाब बनली आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील आदर्शनगर वसाहतीमधील 80 वर्षीय महिला, गणेशनगर मधील 52 व 46 वर्षीय इसम, इंदिरानगर मधील 40 वर्षीय तरुण, घोडेकरमळ्यातील 30 वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगा, पडताणी कॉम्लेक्समधील 35 वर्षीय तरुण व भारतनगर मधील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक बाधित झाल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच ग्रामीणभागातील आश्‍वी खुर्दमधील 50 वर्षीय इसम, धांदरफळ खुर्दमधील 21 वर्षीय महिला, हिवरगाव पठार भागातील 40 वर्षीय तरुण, नंदूर खंदरमाळ येथील 64 व 62 वर्षीय ज्येष्ठांसह 55 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 30 वर्षीय तरुण, निमगाव भोजापूर येथील 39 वर्षीय तरुण, चिखली येथील 65 व 48 वर्षीय इसम, राजापूर येथील 30 वर्षीय तरुण, रहिमपूर येथील 48 वर्षीय महिला, लोहारे येथील 35 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 41 वर्षीय महिला, चनेगाव येथील 35 वर्षीय तरुण, सोनुशी येथील 54 वर्षीय इसमासह 35 व 20 वर्षीय तरुण, कोकरेवाडी येथील 75 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 44 वर्षीय इसम, डिग्रेस येथील 45 वर्षीय इसम, हंगेवाडी येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 74 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चिंचोली गुरव येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व कनोली येथील 45 वर्षीय महिला अशा एकूण 34 जणांना कोविडची लागण झाल्याने तालुक्याच्या रुग्णसंख्येत भर पडून एकूण रुग्णसंख्या 5 हजार 360 वर पोहोचली आहे.