8 डिसेंबरला शेतकर्यांकडून भारत बंदची हाक-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात चर्चेच्या फेर्या निष्फळ ठरत असल्याने संतप्त शेतकर्यांनी आता भारत बंदची हाक दिली आहे. 8 डिसेंबरला एक दिवसाचा देशव्यापी संप शेतकर्यांनी पुकारला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात आम्ही हा संप पुकारला असून शेतकर्यांच्या संपाचा आज नववा दिवस आहे. मोदी सरकारने कृषी कायदे रद्द करावेत त्यात सुधारणा करु नये अशी आग्रही मागणी शेतकर्यांनी केली आहे. पंजाब, हरयाणा या राज्यातले शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यांना अडवण्यात आले असले तरीही ते आंदोलनावर ठाम आहेत. केंद्र सरकारने चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे मात्र आत्तापर्यंतच्या चर्चेच्या फेर्या निष्फळ ठरल्या आहेत. त्यानंतर आता शेतकर्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकर्यांच्या मदतीला देशातील इतर राज्यातील शेतकरीही आता दिल्लीकडे निघाले आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिकच तीव्र होणार आहे. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्यांनी आक्रमक धोरण घेतले असून हा कायदा रद्द करण्यासाठी दिल्लीमध्ये ठाण मांडले आहे. कृषी विधेयके संसदेत मंजुर झाल्यानंतर राज्याराज्यात आंदोलन करणारे शेतकरी कायदा अस्तित्वात आल्यानंतर दिल्लीत येऊन धडकले आहेत. मागील आठवडाभरापासून शेतकर्यांनी दिल्लीच्या सीमेवर मुक्काम ठोकला असून, सरकारसोबत चर्चाही सुरू आहे. आतापर्यंत चार फेर्या पार पडल्या आहेत. मात्र, चारही वेळा चर्चा फिस्कटली. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून केंद्र सरकारने हे काळे कायदे मागे न घेतल्यास संसदेला घेरण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी दिला आहे. कृषी क्षेत्र अधिक खुले करण्याचा दावा करत मोदी सरकारने तीन कृषी कायदे केले. या कायद्यांना शेतकर्यांकडून कडाडून विरोध होताना दिसत आहे. आधी राज्याराज्यात शेतकर्यांनी आंदोलनं सुरू केली. मात्र, सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने शेतकर्यांनी ‘चलो दिल्ली’ ची हाक दिली होती. दिल्लीत आंदोलनासाठी दाखल होण्याआधीच शेतकर्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत.केंद्र सरकार व शेतकर्यांमध्ये आतापर्यंत चार वेळा चर्चा झाली असून, त्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. आज दुपारी दोन वाजता केंद्र सरकार व शेतकर्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी होणार आहे. या बैठकीत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही, तर संसेदला घेराव घालू, असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.े. त्यामुळे पाचव्या फेरीत तोडगा निघतो की, आंदोलन उग्र होणार हे ठरणार आहे.