अवश्य वाचा


  • Share

Deprecated: mysql_connect(): The mysql extension is deprecated and will be removed in the future: use mysqli or PDO instead in /home/yuvavart/public_html/yuvavarta.in/db.php on line 3

नवीन अकोले रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास, रस्त्याची मात्र झाली चाळण

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाल्यानंतर एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नगरपालिकेने नेहरू चौक व मालदाड रोड येथील भाजीबाजाराचे विभाजन केले होते. त्यानुसार शहरातील नवीन अकोले रोडवर भाजी बाजार भरवला जात होता. मात्र पालिकेने काल मंगळवारी येथील हा बाजार उठवून पुन्हा पहिल्या जागेवर बसण्याच्या सुचना व्यापारी वर्गाला दिल्या. त्यानुसार आज पासून येथील भाजी बाजार उठल्याने या रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला आणि येथील वाहतूक सुरळीत झाली. मात्र या रस्त्यांची पुर्णतः चाळण झाल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नवीन अकोले रोडवर भाजीबाजार भरल्याने भाजीविक्रेत्यांबरोबर खरेदीदारांची मोठी गर्दी होत असल्याने या रस्त्यावर वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. शेजारी असणारे पेटीट हायस्कुल बंद असल्याने हा बाजार बिनदिक्कत सुरु होता. मात्र या ठिकाणी सर्कल असल्याने व धोकादायक वळण असल्याने नेहमीच अपघाताची शक्यता व्यक्त होत होती. त्यातच आता पुन्हा शाळा सुरु होण्याची शक्यता असल्याने हा भाजीबाजार अडचणीचा ठरत होता. मात्र आता पालीकेने शहरातील भाजीबाजार पुर्ववत सुरु केल्याने येथील बाजार उठविण्यात आला आहे. दरम्यान आधीच खराब झालेल्या या रस्त्यावर वीज वितरण कंपनीने भुमीगत वीजवाहिनी टाकण्यासाठी रस्ते ठिकठिकाणी खोदल्याने या रस्त्यावर खड्ड्याचे व खडीचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालक हतबल झाले आहेत. त्यामुळे पालीकेने तात्काळ दुरुस्त करुन घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.