अवश्य वाचा


  • Share

संगमनेर तालुक्यात कोरोनाचा चढउतार सुरुच

Date - 2/12/2020 संगमनेर तालुक्यात कोरोनाचा चढउतार सुरुच संगमनेर (प्रतिनिधी) मागील अनेक महिन्यांपासून संगमनेरच्या मानगुटीवर बसलेले कोरोनाचे भुत अद्यापही उतरताना दिसत नाही. एखादा अपवाद वगळता रोज मोठी रुग्णसंख्या समोर येताना दिसत आहे. तालुक्यात कोरोनाचा चढउतार सुरुच असल्याने नागरिकांमध्ये कोरोना भिती कायम आहे. मंगळवारी अँटीजन टेस्ट व खाजगी प्रयोगशाळेमधुन आलेल्या अहवालातुन 49 नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या 5,247 वर जाऊन पोहचली आहे. यात शहरी भागातील 1447 तर ग्रामीण भागातील 3800 रुग्णांचा समावेश आहे. दिलासा दायक बाब म्हणजे कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 93.67% असून मृत्यूदर घसरुन तो केवळ 0.86% इतका राहिला आहे. मंगळवारी रात्री आलेल्या अँटीजेन टेस्टमधुन शहरातील साईश्रध्दा चौकातील 60, 59 वर्षीय पुरुष, गणेश नगर येथील 35 वर्षीय महिला, कुभारआळा येथील 55 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथील 70 वर्षीय पुरुष, नगरपालिकेशेजारी 82 वर्षीय महिला, शहरातील 26 वर्षीय पुरुष, अकोले नाका 45 वर्षीय पुरुष, गणेशनगर 19 वर्षीय महिला, शिवाजी नगर येथील 34 वर्षीय पुरुष, साळीवाडा 39 वर्षीय पुरुष, मोगलपुरा 80 वर्षीय पुरुष, अभंगमळा येथील 56 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. तर तालुक्यातील 28 वर्षीय पुरुष, डोळासणे 27 वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर गुंजाळवाडी 53,58,36 वर्षीय पुरुष, 33, 41 वर्षीय महिला, घारगाव येथील 57, 30 वर्षीय पुरुष, 38, 50 वर्षीय महिला, खंदरमाळ 45 वर्षीय पुरुष, वेल्हाळे 48 वर्षीय पुरुष, साकुर 45 वर्षीय पुरुष, रायते येथील 45 वर्षीय पुरुष, 35, 75 वर्षीय महिला, खांडगाव 21 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, कर्‍हे 55 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, पिंपळगाव माथा येथील 60, 25 वर्षीय पुरुष, उंबरी बाळापूर येथील 28, 51 वर्षीय पुरुष, बोटा 44 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, धांदरफळ बुद्रुक 80, 74 वर्षीय पुरुष, घुलेवाडी 34, 30, 54 वर्षीय पुरुष, साकुर 74 वर्षीय पुरुष, कोकणगाव 68 वर्षीय महिला, निमगाव टेंभी 55 वर्षीय महिला, पोखरी हवेली 56 वर्षीय पुरुष असा एकुण 49 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाचा तालुक्यात सुरु असलेला प्रादुर्भाव क ायम असुन शहरात थांबलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. शासकीय स्तरावरुन माझे कु टुंब माझी जबाबदारी ही मोहीम अनेक ठिकाणी थांबली आहे. त्यामुळे माझे आरोग्य माझी जबाबदारी आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी हे लक्षात घेऊन प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळावे व क ोरोनाला दुरु ठेवण्याची गरज आहे.