अवश्य वाचा


  • Share

डॉ. ऋषीकेश वाघोलीकर यांच्याकडून वृद्धाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी

संगमनेर- डॉ ऋषिकेश वाघोलीकर हे युरोलॉजीस्ट (सुपर स्पेशालिस्ट) असून ते संगमनेरमधील माजी सुप्रसिद्ध फिजीशियन स्व. डॉ. दिनेशजी वाघोलीकर यांचे चिरंजीव आहेत. गेल्या दिड वर्षापासून ते संगमनेर व आजुबाजूच्या परिसरात कार्यरत असून या कालावधीत त्यांनी आत्तापर्यंत मुतखडा, प्रोस्टेट व इत्तर मुत्रविकारांवर 750 हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. विशेष म्हणजे कोव्हीड काळातही मागील दोन महिन्यात त्यांनी 6 वेळा युरेथ्रोप्लास्टी ही किचकट शस्त्रक्रिया केली आहे.डॉ. वाघोलीक यांनी नुकतीच एका वृद्धावर अवघड शस्त्रक्रिया करून रूग्णास नवजीवन दिले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. नामदेव केरे, वय वर्षे 66 या वृद्ध इसमाला बर्‍याच वर्षांपासून लघवीचा त्रास होत असे. लघवी करताना वेळ लागणे, वारंवार इन्फेक्शन होणे ह्यामुळे ते अगदी त्रासले होते. तपासण्या केल्यानंतर असे लक्षात आले की त्यांची पूर्ण मुत्रनलिका ही खराब झाली (युरेथ्रल स्ट्रीक्चर) असून त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नव्हते. तेव्हा त्यांनी संगमनेर येथील प्रथितयश मुत्रविकारतज्ञ डॉ. ऋषिकेश वाघोलीकर यांची भेट घेतली. डाक्टरांनी अन्य तपासण्या केल्यानंतर ‘युरेथ्रोप्लास्टी’ हे ऑपरेशन करण्याचे ठरले. दोन्ही गालाच्या आतली कातडी ( बकल म्युकोजा ग्राफ्ट) घेऊन त्यापासून नविन मूत्रनलिका बनवण्यात आली. संपुर्ण मुत्रनलिका खराब असल्याने ऑपरेशन तब्बल 5 तास चालले. पेशंट वयस्कर असल्याने भूल देताना नेहमीपेक्षा जास्त धोका असतो. तसेच ऑपरेशनची जखम भरून येण्यास अडथळा येऊ शकतो. असे असतानाही, पेशंटला ऑपरेशन झाल्यावर पाचव्या दिवशी डिस्चार्ज करता आले. पेशंटलाही ऑपरेशनचा कसलाही त्रास झाला नाही. नंतर 4 आठवडयानंतर लघवीची नळी काढल्यानंतर पेशंटला व्यवस्थित लघवी झाली व पूर्ण जखम भरून आली. पेशंटला आधी इतक्या वर्षापासून असलेला लघवीचा त्रास या ऑनरेशनमुळे संपूर्ण बरा झाला आहे. विशेष म्हणजे सदर शस्त्रक्रिया महात्मा फुले योजने अंतर्गत धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल येथे पूर्ण मोफत करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आनंदीत झालेल्या नामदेव केरे यांनी डॉ. वाघोलीकर यांचे विशेष आभार मानले.धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये अनेकवेळा अनेक पेशंटवर अवघडातील अवघड शस्त्रक्रिया होत असतांना सर्व सामान्य रूग्ण मुंबई, पुणे, नाशिकला जाण्याचा त्रास वाचत आहे. वेळ व पैसा वाचत असल्याने व चांगले उपचार होत असल्याने रूग्णांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.