अवश्य वाचा


  • Share

उपनगराध्यक्षपदी कुंदन लहामगे

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे नगरसेवक कुंदन लहामगे यांची एकमताने निवड करण्यात आली. विद्यमान उपनगराध्यक्षा सुमित्रा दिड्डी यांची मुदत संपल्याने आज झालेल्या पालिकेच्या सर्वसाधार बैठकीत कुंदन लहामगे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. कुंदन लहामगे व लहामगे परिवार काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून त्यांच्यावर नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे व काँग्रेस श्रेष्ठींनी मोठा विश्‍वास टाकत मोठी जबाबदारी सोपविली आहे. पुढील वर्षी पालिकेच्या निवडणूका होणार असून विकास कामांची मोठी संधी पालिकेला आहे.