अवश्य वाचा


  • Share

संगमनेरकरांना दिलासा, रूग्णसंख्येत घट

संगमनेर (प्रतिनिधि) दिवाली नंतर वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतांना दिसत असल्याने संगमनेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. रविवारी शहर व तालुक्यात कोविडचे केवळ 21 रुग्ण आढळून आले असून अनेक रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. कोविड बाबत शनिवार, रविवार नेहमीच संगमनेकरांना धक्कादायक ठरलेला आहे. मात्र या रविवारी शहरात 9 तर तालुक्यात 12 असे एकुण 21 रुग्ण आढळून आले आहे. या वाढीव संख्येमुळेे तालुक्याची रुग्ण संख्या 667 वर पोहचली आहे. रविवारी आढळून आलेल्या रुग्णामध्ये शहरातील इंदिरानगर येथील 62 वर्षीय महीला, अभिनव नगर येथील 11 व 40 वर्षीय महीला, शिवाजी नगर येथील 65 वर्षीय महीला, नाईकवाडपुरा येथील 71 व 32 वर्षीय पुरूष, देवीगल्ली येथील 48 वर्षीय पुरूष, मालदाड रोड येथील 52 वर्षीय पुरूष, इंदिरानगर येथील 58 वर्षीय पुरूष, परदेशपुरा येथील 34 वर्षीय पुरूष कहे तर ग्रामीण भागातील घुलेवाडी येथील 56 वर्षीय पुरूष, झरेकाठी येथील 52 वर्षीय पुरूष, निमगाव बुद्रुक येथील 38 वर्षीय पुरूष, निमोण 60 वर्षीय महीला, कौठे येथील 65 वर्षीय महीला, आश्‍वी बुद्रुक येथील 38, 72 वर्षीय पुरूष, काकडवाडी येथील 60 वर्षीय पुरूष, पोखरी हवेली 29 वर्षीय पुरूष, रायते येथील 38 वर्षीय पुरूष आदि रूग्णांचा समावेश आहे. यात आठरा अहवाल हे खासगी लॅबमधून तर 3 अहवाल अँटीजन टेस्टमधून प्राप्त झाले आहे. खासगी, शासकीय रूग्णालयात सुरू असलेल्या कोरोना चाचणीतून रोज नव नवीन रूग्ण आढळून येत आहे. शहराबरोबरच ग्रामिण भागातही रोज नवे रूग्ण सापडत आहे. नागरीकांनी कोरोनाबाबत दक्षता घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा वापर नेहमी करावा. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोनापासून दुर राहावे.