अवश्य वाचा


  • Share

ज्येष्ठ नेते मधुकर नवले काँग्रसमध्ये जाणारा मिनानाथ पांडेंसह अनेक नेते करणार पक्षांतर,राष्ट्रवादी व भाजपमध्ये फुट

ज्येष्ठ नेते मधुकर नवले काँग्रसमध्ये जाणारा मिनानाथ पांडेंसह अनेक नेते करणार पक्षांतर,राष्ट्रवादी व भाजपमध्ये फुट अकोले (प्रतिनिधी) कम्युनिस्ट व पुरोगामी विचाराचा तालुका असणार्‍या अकोले तालुक्यात काही दिवसांपुर्वी मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ झाली. अनेकांना स्वपक्ष सोडून इतर पक्षात जाऊन बळजबरीचा रामराम घ्यावा लागला. नेते रमले मात्र, कार्यकर्ते रमेना, त्यातच वैचारीक बैठक असणार्‍या शेतकरी नेते मधुभाऊ नवले यांच्यासह अनेक नेत्यांना पुन्हा स्वपक्षाचे वेद लागले. त्यातच राष्ट्रवादीत बाहेरून आलेल्यांचे प्राबल्य वाढल्याने मुळ कार्यकर्त्यांना पक्षात रहाणेे जिकरीचे झाले. त्यामुळे ज्येष्ठ नेते मधुभाऊ नवले, मिनानाथ पांडे, मदन पथवे यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हे नेते व असंख्य कार्यकर्ते पक्षांतर करणार आहे. या पक्षांतरामुळे अकोले तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलणार असून काँग्रेसला उभारी मिळून भाजप व राष्ट्रवादीचे नुकसान होणार आहे. ज्येष्ठ नेते मधुभाऊ नवले यांनी सुरवातीला भारतीय कम्युनिस्ट पक्षात काम केले. त्यानंतर काँग्रेस पक्षात, जिल्हा काँग्रेसचे जिल्हा शेतकरी-शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष आणि नंतर जिल्हा परिषद सदस्य झाले. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माजी मंत्री मधुकर पिचड यांच्याबरोबर काम केले. सध्या ते भाजपमध्ये आहेत; पण तेथे फार काळ रमले नाही. मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक व अगस्ती कारखान्याचे विद्यमान संचालक मीनानाथ पांडे यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक म्हणून चाळीस वर्षे काम केले. विधानसभेनंतर राष्ट्रवादीत राहण्याचे ठरविले होते, मात्र राष्ट्रिवादीमध्ये त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली नाही. लोकप्रतिनिधीकडून त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. मंत्री बाळासाहेब थोरात यांची तालुक्याचे प्रश्‍न सोडविण्यासा निश्‍चित मदत होईल. त्यामुळे आपण काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच तारीख घेऊन पक्षात सहभागी होऊ असे ज्येष्ठ नेते मधुकर नवले आणि मिनानाथ पांडे यांनी म्हंटले आहे. मधुभाऊ नवले व मिनानाथ पांडे यांनी अनेक वर्षे माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांना साथ दिली. तसेच ना. बाळासाहेब थोरात यांच्याशी कायम स्नेह ठेवला. मात्र पिचड यांनी पक्षांतर केल्याने अनेकांची आडचण झाील. विचार मान्य नसणार्‍या पक्षात हे नेते फार काळ टिकले नाही. त्यामुळे हा पक्षांतराचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे अकोले तालुक्यात राजकीय खळबळ उडणार आहे.