अवश्य वाचा


  • Share

संगमनेर तालुक्यात कोविडचा पुन्हा उद्रेक..! दिवाळी नंतर सलग चौथ्या दिवशी 50 जणांना बाधा !!

दि. 20/11/2020 संगमनेर तालुक्यात कोविडचा पुन्हा उद्रेक..! दिवाळी नंतर सलग चौथ्या दिवशी 50 जणांना बाधा !! संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्याला दिवाळीची धामधूम चांगलीच महागात पडली असून या धामधुमीमध्ये कोरोनाने आपला डाव साधत पुन्हा मोठ्या प्रमाणावर उद्रेक करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीनंतर कोरोना रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होत असून रोज सरासरी 50 रुग्ण सापडत आहेत. त्यामध्ये आजही तब्बल 50 रुणाची भर पडली आहे. त्यामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. आज तालुका व शहर मिळून 50 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज आलेल्या अहवालामध्ये संगमनेर शहरातील 1 पुरुष, स्वामी समर्थ नगर येथील 1 पुरुष, इंदिरानगर येथील 4 पुरुष, कोल्हेवाडी रोड येथील 2 महिला व 1 पुरुष, विद्यानागर येथील 2 महिला 2 पुरुष, नवीन नगर रोड येथील 1 महिला, गांधी चौक येथील 1 महिला 2 पुरुष, देवाचा मळा येथील 1 पुरुष असा अठरा जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील 1 पुरुष, खांडगाव येथील1 महिला, वडगाव लांडगा येथील 2 महिला, निमगाव भोजापूर येथील 1 पुरुष, 1 महिला, रहिमपूर येथील 1 पुरुष, उंबरी बाळापूर येथील 4 पुरुष, कोंची येथील 1 पुरुष, प्रतापपुर येथील 1 पुरुष, जोर्वे येथील 1 महिला 1 पुरुष, आश्वि बुद्रुक येथील 4 महिला, 2 पुरुष, निमगाव जाळी येथील 1 महिला, गुंजाळवडी येथील 2 महिला, 1 पुरुष, पळसखेडे येथील 2 महिला, कोकणगाव येथील 1 पुरुष, दाढ बुद्रुक येथील 1 पुरुष, पिंपळगाव कोंझिरा येथील 2 महिला, निमज येथील 1 पुरुष असा 32 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजची एकूण संख्या 50 झाली आहे. ह्या वाढत्या संख्येने मात्र संगमनेरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता पुन्हा स्वयंशिस्त पाळणे गरजेचे बनले आहे.