अवश्य वाचा


  • Share

39 जणांना बाधित करत आजही कोरोना प्रबळच

दि. 15/10/2020 39 जणांना बाधित करत आजही कोरोना प्रबळच संगमनेर प्रतिनिधी संगमनेर शहर व तालुक्याला वेठीस पकडणारा कोरोना संपण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. यामध्ये आजही भर पडत 39 जणांना बाधित केले आहे. खाजगी प्रयोगशाळा व अँटीजन टेस्टच्या माध्यमातून आलेल्या अहवालातून आज 39 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील इंदिरानगरमधील 56 वर्षीय महिला, नेहरु चौक परिसरातील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सावतामाळी नगर परिसरातील 33 वर्षीय तरुण, ताजणे मळ्यातील 35 वर्षीय महिला, विद्यानगर परिसरातील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35 वर्षीय महिला व 12 वर्षीय मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहाराबरोबरच आज आज ग्रामीण भागातील 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये भोजदरी येथील 25 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 38 वर्षीय तरुण, ढोलेवाडी येथील 52 वर्षीय इसम, घारगाव मधील 24 वर्षीय महिलेसह चार वर्षीय बालक, गुंजाळवाडी येथे 52 वर्षीय इसमासह 28 वर्षीय तरुण, 62 व 42 वर्षीय दोन महिला, जाचकवाडी येथील 24 वर्षीय महिला, जोर्वे येथील 54 वर्षीय इसम, कनोली येथील 55 वर्षीय महिला, केळेवाडी येथील 30 वर्षीय तरुण, खळी येथील 45 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 40 वर्षीय तरुण, कोळवाडे येथील 50 वर्षीय इसम, नान्नज दुमाला येथील 53 वर्षीय महिला, ओझर खुर्द मधील 55 वर्षीय इसमासह 26 वर्षीय महिला व चार वर्षीय बालक, पिंपरी येथील 22 वर्षीय महिला, प्रतापपूर येथील 35 वर्षीय महिला, रहिमपूर येथील 58 वर्षीय इसम, राजापूर मधील 60 वर्षीय महिला, समनापुर मधील 48 वर्षीय इसम, तळेगाव दिघे येथील 25 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 51 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुण आणि 18 वर्षीय तरुणी आदी 32 जणांसह एकूण 39 जणांचे अहवाल आज संक्रमित असल्याचे प्राप्त झाले आहेत. तालुक्याच्या रुग्ण संख्येत आजही 39 रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या आता 3 हजार 856 पोहोचली आहे.