अवश्य वाचा


  • Share

मंदावलेला कोरोना पुन्हा सक्रिय आज पुन्हा 42 जणांना बाधा

दि. 13/10/2020 मंदावलेला कोरोना पुन्हा सक्रिय आज पुन्हा 42 जणांना बाधा संगमनेर (प्रतिनिधी) शहर व तालुक्यात मागील दोन दिवसात मंदावलेल्या कोरोनाने आज पुन्हा सक्रिय होत आज पुन्हा 42 जणांना बाधित केले आहे. त्यामुळे दोन दिवस दिलासा मिळविलेल्या संगमनेरकरांवर कोरोनाची टांगती तलवार अजूनही तशीच आहे. आज आलेल्या अहवालामध्ये संगमनेर शहरातील आजच्या एकूण रुग्णसंख्येत संगमनेर शहरातील 13 जणांचा समावेश आहे. त्यात मालदाड रोडवरील 64 व 47 वर्षीय इसम, रहेमतनगर परिसरातील 66 वर्षीय महिला, इंदिरानगर परिसरातील 59 वर्षीय महिला, गणेशनगर मधील 58 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण, जनतानगर परिसरातील 52 वर्षीय इसमासह 24 वर्षीय तरुण, 48 वर्षीय महिला व सतरा वर्षीय तरुणी तर केवळ संगमनेर असा पत्ता नोंदवलेल्या तिघांचे अहवालही पॉझिटिव प् आज तालुक्यातील ग्रामीण भागात 29 जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले. त्यात ओझर खुर्द येथील 28 वर्षीय तरुण, बोटा येथील 32 वर्षीय तरुण, भोजदरी येथील 67 व 50 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला, कुरकुटवाडी येथील 40 वर्षीय महिला, झोळे येथील 43 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 32 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 30 वर्षीय तरुण, 45 व 21 वर्षीय महिला, तसेच एक वर्षवर्षीय बालिका, पिंपळे येथील 55 वर्षीय महिला, डिग्रस येथील 35 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 36 वर्षीय तरुणासह निर्मलनगर परिसरातील 67 वर्षीय महिला, कोळवाडे येथील 45 वर्षीय महिलेसह 23 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 39 वर्षीय तरुण व 21 वर्षीय महिला, वरुडी पठार येथील 47 वर्षीय इसम, निमगाव जाळी येथील 58 वर्षीय इसम, राजापूर येथील 38 व 20 वर्षीय तरुण, पिंपळगाव कोंझिरा येथील 73 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कासारा दुमाला येथील 51 वर्षीय इसम, संगमनेर खुर्द मधील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह हिवरगाव पावसा येथील 22 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. आज तालुक्याच्या रुग्णसंख्येत एकूण 42 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याने बाधितांचे 38 वे शतक ओलांडून 3 हजार 814 रुग्णसंख्या वर पोहचली आहे. थांबलेला कोरोना दिलासा देता देता पुन्हा धक्का देत असल्याने संगमनेरकरांचे चांगलेच धाबे दणाणत आहेत.