अवश्य वाचा


  • Share

कोरोनाचा वेग मंदावला पण धोका कायम आज पुन्हा 32 जणांना बाधा

दि. 12/10/2020 कोरोनाचा वेग मंदावला पण धोका कायम आज पुन्हा 32 जणांना बाधा संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढत चाललेला वेग मागील दोन दिवसांपासून मंदावत असल्याचे दिसून येत आहे. रोज अर्धशतकपार करणाऱ्या कोरोनाने काल 19 जणांना बाधित केले होते. तर आज 32 जणांना बाधित केले आहे. कालच्या पेक्षा आजची संख्या थोडी जास्त असली मागील काही आठवड्यांच्या तुलनेत कमी असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. आज आलेल्या अहवालामध्ये संगमनेर शहरातील 5 जनांचा समावेश आहे तर तालुक्यातील ग्रामीण भागातील 27 जणांना बाधा झाली आहे. आज आलेल्या अहवालानुसार संगमनेर आज शहरातील कोष्टी गल्लीतून चार रुग्ण समोर आले. त्यात 85 व 50 वर्षीय महिलेसह 55 वर्षीय इसम, तसेच आठ वर्षीय बालिका, आणि चंद्रशेखर चौकातून 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहराबरोबरच तालुक्यातही ग्रामीण भागातील केळेवाडी येथील 60 वर्षीय इसमासह 55 वर्षीय महिला, शेळकेवाडी येथील 55 वर्षीय महिला, भोजदरी येथील 35 वर्षीय तरुण, कुरकुटवाडी येथील 22 व 16 वर्षीय तरुण, आंबी दुमाला येथील 18 वर्षीय तरुणी, अकलापुर येथील 37 व 20 वर्षीय महिलेसह 17 व 15 वर्षीय तरुण, आनंदवाडी येथील 52 इसमासह 40 व 35 वर्षीय तरुण, 45, 38 व 21 वर्षीय महिला, तसेच 12 व चार वर्षे वयाची दोन बालके, झोळे येथील 18 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्द मधील 30 वर्षीय तरुण, जवळेबाळेश्वर येथील 29 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी पठार येथील चार वर्षीय बालक, जवळेकडलग येथील 52 वर्षीय महिला, तळेगाव येथील 30 वर्षीय तरुण व वडगाव पान येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. असा एकूण 32 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकूण संख्या 3772 झाली आहे. कोरोना संक्रमणाचा वेग जरी मंदावला असला तरी पुन्हा वाढण्याचा धोका असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.