दि. 10/10/2020 आजही कोरोनाने गाठले अर्धशतक शहरातील सात जनांसह 53 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाने रोज नवनवीन विक्रम करण्याचा धडाका लावला आहे. त्यात आजही मोठी संख्या टाकून अर्धशतकपार नेत 53 जणांना बाधित केले आहे. यामध्ये शहरातील 7 जनांचा तर ग्रामीण भागातील 46 जणांचं समावेश आहे. आज संगमनेर शहरातील अशोक चौक परिसरातून नव्याने रुग्ण समोर आले आहेत. त्यात 38 वर्षीय महिलेसह 20 व 16 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. त्यासोबतच बाजारपेठेतून 21 वर्षीय तरुण, जानकीनगर मधून 43 व 17 वर्षीय महिला आणि नवीन नगर रोड परिसरातून 52 वर्षीय इसमाचा असा सात जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच बरोबर ग्रामीण भागात आज आढळलेल्या रुग्णांमध्ये शेडगाव मधील 80 वर्षीय इमासह 26 वर्षीय तरुण, तसेच 73, 45 व 20 वर्षीय महिला, पिंपरी येथील 32 वर्षीय महिला, हंगेवाडी येथील 70 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 33 वर्षीय तरुण, आनंदवाडी येथील 58 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 66 वर्षीय महिलेसह 26 वर्षीय तरुण, पेमगिरी येथील 27 वर्षीय तरुण, खराडी येथील 60 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द मधील 48, 34, 32, 26 व 23 वर्षीय महिलांसह नऊ वर्षीय बालिका, तसेच 34 वर्षीय तरुण, कुरकुंडी येथील 65 वर्षीय इसम, औरंगपूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 43 वर्षीय तरुण, तसेच 42, 40 व 24 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 32 वर्षीय महिलेसह 24 वर्षीय तरुण, अकरा वर्षीय बालिका व पाच वर्षीय बालक, गुंजाळवाडी पठार येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 33 वर्षीय महिला व 14 वर्षीय बालिका, कनोली येथील 34 वर्षीय तरुण, साकुर मधील 39 वर्षीय महिलेसह 45 व 32 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 39 वर्षीय तरुणासह 35 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा व अकरा वर्षीय बालिका, महालवाडी येथील 53 वर्षीय इसम, सोनोशी येथील 60 वर्षीय महिला, झोळे येथील 51 व 28 वर्षीय महिलेसह हिवरगाव पावसा येथील 48 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आज एकूण 53 जनांची भर पडली. तालुक्याची एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 723 वर पोहोचला आहे. या वाढत्या संख्येने तालुक्यात भीतीदायक वातावरण आहे.