अवश्य वाचा


  • Share

आज पुन्हा कोरोनाचा विक्रम आज पुन्हा तब्बल 74 जणांना बाधा संगमनेर शहरातील 17 तर ग्रामीण मधील 57 जणांचा समावेश

दि. 09/10/2020 आज पुन्हा कोरोनाचा विक्रम आज पुन्हा तब्बल 74 जणांना बाधा संगमनेर शहरातील 17 तर ग्रामीण मधील 57 जणांचा समावेश संगमनेर प्रतिनिधी संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। त्यामध्ये आज कोरोनाने मोठी भर टाकत तब्बल 74 जणांना बाधित करत पुन्हा एक नवा विक्रम केला आहे. संगमनेर शहराकडे दुर्लक्ष केलेल्या कोरोनाने आज पुन्हा आपला मोर्चा शहराकडे वळविला असून आज 17 जणांना बाधित केले आहे. तर ग्रामीण भागातील घोडदौड कायम ठेवत तब्बल 57 जणांना बाधित केले आहे. आज आलेल्या अहवालानुसार संगमनेर शहरातील जानकीनगर परिसरात राहणाऱ्या 43 वर्षीय महिलेसह 17 वर्षीय तरुणी, पावबाकी रस्त्यावरील 58, 25 व 23 वर्षीय महिलांसह 30 वर्षीय तरुण, विठ्ठल नगर परिसरातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक सदाशंकर नगर मधील 33 वर्षीय तरुण, कुरण रोड वरील 50 वर्षीय महिला, शिवाजी नगर मधील 21 वर्षीय महिला, संगमनगर मधील 80 व 53 वर्षीय इसमासह 38, 30 व 29 वर्षीय तरुण असा सतरा जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तालुक्यातील खांजापुर मधून 19 वर्षीय तरुण, सुकेवाडी येथील 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 32 30 वर्षीय तरुण, तसेच 12 वर्षीय बालिका, संगमनेर खुर्द येथील 61 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 38 वर्षीय तरुण, पिंपरी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 22 वर्षीय तरुण, शेडगाव येथील 48 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण व 60 वर्षीय महिला, हंगेवाडी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 32 वर्षीय तरुण, घारगाव येथील 40 वर्षीय महिलेसह 32 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 63 व 42 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुणी व 20 वर्षीय तरुण, निमगाव भोजापूर येथील 37 व 28 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक येथील 55 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 55 वर्षीय इसम, रहिमपूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, औरंगपूर येथील 43 व 19 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 35 व 27 वर्षीय तरुण, बोटा येथील 20 वर्षीय तरुणी, माळवाडी येथील 50 वर्षीय महिलेसह 44 वर्षीय तरुण, आंबी दुमाला येथील 70 वर्षीय महिला, अकलापुर मधील 45 वर्षीय इसम, कुरकुटवाडी येथून 40 वर्षीय तरुण, झोळे येथील 23 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 40 वर्षीय महिला, आनंदवाडी येथील 28 वर्षीय तरुण, खराडी येथील 49 वर्षीय इसम, कुरकुंडी येथील 68 वर्षीय महिला, पेमगिरी येथील 50 वर्षीय इसम, नांदूर खंदरमाळ येथील 65 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 51 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 51 वर्षीय इसम, तर आज गुंजाळवाडीत कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. तेथून आज तब्बल 11 रुग्ण समोर आले आहेत. त्यात 62 व 57 वर्षीय इसमासह 31, 24 व 24 वर्षीय तरुण, 60, 53, 45 व 29 वर्षीय महिलांसह 03 वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तालुक्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाने तब्बल 3 हजार 670 रुग्णसंखेचा आकडा गाठला आहे. कोरोनाच्या या वाढत्या संख्येने चिंताग्रस्त वातावरण पसरले आहे.