अवश्य वाचा


  • Share

संगमनेर मध्ये आज पुन्हा 30 जणांना कोरोनाची बाधा तर 51 जणांची कोरोनावर मात ग्रामीण मध्ये अजूनही प्रभाव सुरूच

संगमनेर मध्ये आज पुन्हा 30 जणांना कोरोनाची बाधा तर 51 जणांची कोरोनावर मात ग्रामीण मध्ये अजूनही प्रभाव सुरूच संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहराला दिलासा देणाऱ्या कोरोनाने ग्रामीण भागाला मात्र पिछाडून सोडले असून. आज आलेल्या अहवालातून पुन्हा 30 जनांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये तब्बल 27 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. आज 30 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह असताना एक दिलासाही तालुक्याला मिळाला आहे. आज तब्बल 51 जणांनी कोरोनावर यशस्वी मात करत आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला आहे. आतापर्यंत तालुक्यातील 3136 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. आज आलेल्या झालेल्या अहवालानुसार शहरातील सावतामाळी नगर परिसरातील 37 वर्षीय महिला, गोविंद नगर परिसरातील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व घोडेकर मळा परिसरातील 65 वर्षीय वर्षीय पुरुष असा तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील तुरळक असणाऱ्या कोरोनाने ग्रामीण भागात पुन्हा धुमाकूळ घातला. आज तालुक्यातील 27 जणांचे अहवालही पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यामध्ये गुंजाळवाडीतील 75, 65 व 60 वर्षीय वृद्ध 35, 30 व 23 वर्षीय तरुण तसेच, 80 वर्षीय वयोवृद्ध महिला, घुलेवाडी येथील 24 वर्षीय महिला, जोर्वे येथील 45 वर्षीय तरुण, अकलापुर येथील 74 वर्षीय महिला, साकुर मधील 54 वर्षीय इसमासह 48 वर्षीय महिला, डेरेवाडी येथील 65 वर्षीय महिला, धांदरफळ बुद्रुक मधील 51 वर्षीय इसम, निमगाव जाळी येथील 55 वर्षीय इसमासह 34 वर्षीय महिला, रहिमपूर येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, प्रतापपूर मधील 84, 79 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 25 व 23 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 50 वर्षीय महिलेसह सात वर्षीय बालिका, नान्नज दुमाला येथील 38 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 17 वर्षीय तरुणी व सारोळे पठार येथील 40 वर्षीय तरुण असा 27 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजची संख्या तीस झाली आहे. 51 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने थोडेसे समाधानकारक वातावरण आहे.