अवश्य वाचा


  • Share

संगमनेर तालुक्यात आजही कोरोना अर्धशतकपार शहरातील 17 तर ग्रामीण भागातील 34 जणांना बाधा ; एकूण 51 जणांची वाढ

दि. 02/10/2020 संगमनेर तालुक्यात आजही कोरोना अर्धशतकपार शहरातील 17 तर ग्रामीण भागातील 34 जणांना बाधा ; एकूण 51 जणांची वाढ संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यतील कोरोना बाधितांचा आकडा वाढताच असून. शहरामध्ये विश्रांती घेतलेल्या कोरोनाने आज पुन्हा सक्रिय होत 17 जणांना बाधित केले आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील घोडदौड अबाधित राखत 34 जणांना बाधित केले आहे. त्यामुळे आजची एकूण संख्या 51 झाली आहे. आज आलेल्या अहवालानुसार संगमनेर शहरातील आँरेंज कॉर्नर परिसरातील 54 वर्षीय 47 वर्षीय महिला व 25 वर्षीय तरुण, निर्मलनगर परिसरातून 43 वर्षीय तरुण, पद्मानगर परिसरातील 51 वर्षीय इसमासह 70 व 45 वर्षीय महिला व 16 वर्षीय तरुण, जनतानगर मधील 45 व 51 वर्षीय महिला, पावबाकी रोड परिसरातील 63 व 56 वर्षीय इसमासह 33 व 29 वर्षीय तरुण तसेच 42 वर्षीय महिला, मालदाड रोड परिसरातील 41 वर्षीय तरुण, कुरण रोड परिसरातील 63 वर्षीय महिला असा सतरा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील पेमगिरी येथील 39 वर्षीय तरुण, निमगाव बुद्रुक येथील 28 व 24 वर्षीय तरुण, रायतेवाडी येथील 48 वर्षीय इसमासह समनापुर येथील 34, 33, 30 व 19 वर्षीय तरुण तसेच एक वर्षीय बालिका, गुंजाळवाडी येथील 75 व 36 वर्षीय महिलेसह 42 वर्षीय तरुण, 14 वर्षीय बालक व बारा वर्षीय बालिका, हिवरगाव पावसा येथील 25 वर्षीय तरुण, पोखरी हवेली येथील 52 वर्षीय इसम, पिंपळगाव कोंझिरा येथील 28 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 72 वर्षीय ज्येष्ठ महिलेसह 38 वर्षीय महिला व 13 वर्षीय बालिका, वडगाव पान येथील 55 वर्षीय इसम, मेंढवण येथील 28 वर्षीय महिला, प्रतापपूर येथील 36 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निळवंडे येथील 30 व 27 वर्षीय तरुण, अकलापुर येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 51 वर्षीय महिला, आंबीदुमाला येथील 70 वर्षीय महिला, माळेगाव हवेली येथील 52 वर्षीय इसम, दरेवाडी येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालदाड येथील 52 वर्षीय महिला व शिबलापूर येथील 50 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजची एकूण संख्या 51 झाली आहे. तसेच तालुक्यातील आत्तापर्यंतच्या कोरोना बाधितांचा आकडा 3 हजार 347 वर गेला आहे.