अवश्य वाचा


  • Share

महिन्याची सुरुवातही कोरोनाच्या अर्धशतकीय पारीने आज पुन्हा 51 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

दि. 01/10/2020 महिन्याची सुरुवातही कोरोनाच्या अर्धशतकीय पारीने आज पुन्हा 51 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात धुमाकुळ घातलेल्या कोरोनाने ऑक्टोबर महिन्याची सुरुवातही जोरदार करत अर्धशतकीय संख्या गाठली आहे. आज आलेल्या अहवालामध्ये शहरातील 10 जणांचा तर तालुक्यातील 41 जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आजची एकूण कोरोना रुग्ण संख्या 51 झाली आहे. आजच्या या संख्येमुळे तालुक्यातील आत्तापर्यंतच्या रुग्णांची संख्या 3251 झाली आहे. आजच्या अहवालातून शिवाजीनगर परिसरातून चार तर देवाचा मळा परिसरातून तीन रुग्ण समोर आले आहेत. शिवाजीनगर मधील 61 व 57 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 29 व 27 वर्षीय तरुण, देवाचा मळा परिसरातील 36 व 24 वर्षीय तरुणांसह बारा वर्षीय बालक, क्षत्रियनगर परिसरातील 24 वर्षीय तरुण, सावतामाळी नगर मधील 33 वर्षीय तरुण व इंदिरानगर मधील 39 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. त्याचबरोबर तालुक्यातील 41 जणांचे अहवालही आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले. गुंजाळवाडीतील 45 व 39 वर्षीय तरुण, सावरगाव तळ मधील 39 वर्षीय तरुणासह 36 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथील 49 वर्षीय इसम, रायतेवाडी येथील 65 वर्षीय महिलेसह 23 वर्षीय तरुण, निमगाव जाळीतील 48 वर्षीय महिलेसह दोन वर्षीय बालक, वडगाव लांडगा येथील 37 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 82 वर्षीय महिला, देवकवठे येथील 49 वर्षीय इसमासह 35 वर्षीय तरुण, चिखली येथील 73 वर्षीय महिलेसह 38 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 41 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 60 वर्षीय महिलेसह 34 वर्षीय तरुण, राहणे मळा येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, माळवाडी येथील 21 वर्षीय तरुणी, बोटा येथील 22 वर्षीय महिला, डोळासणे येथील 60 वर्षीय दोघा ज्येष्ठ नागरिकांसह तीस वर्षीय तरुण, पिंपळदरी येथील 40 वर्षीय महिला, घारगाव येथील 32 वर्षीय तरुणासह 22 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 34 वर्षीय तरुण, मंगळापुर येथील 34 वर्षीय महिला, सायखिंडी येथील 38 वर्षीय तरुण, शिवापूर येथील 23 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 48 वर्षीय इसम, कऱ्हे येथील 19 वर्षीय तरुण, झोळे येथील 47 वर्षीय इसमासह 37 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुण, पेमगिरी येथील तीस वर्षीय महिला, रायते येथील 59 वर्षीय इसमासह 38 वर्षीय तरुण व 26 वर्षीय महिला अशा एकूण एक्कावन्न जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 3 हजार 251 वर पोहोचली आहे.