अवश्य वाचा


  • Share

संगमनेर तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ आज पुन्हा सापडले 66 नवे रुग्ण दोन दिवसात तब्बल 146 जणांना बाधा

दि. 05/09/2020 संगमनेर तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ आज पुन्हा सापडले 66 नवे रुग्ण दोन दिवसात तब्बल 146 जणांना बाधा संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून हा कोरोनाचा धुमाकूळ थांबण्याचे कुठलेही लक्षण सध्यातरी दिसून येत नाही. काल संध्याकाळी 80 रुग्ण सापडल्यानंतर आज आलेल्या अहवालानुसार पुन्हा 66 रुग्णाची भर यामध्ये पडली आहे. त्यामुळे दोन दिवसात तब्बल 146 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज आलेल्या अहवालानुसार संगमनेर शहरातील बाजारपेठ येथील 70, 42 पुरुष, 7 वर्षीय मुलगा आणि 38 व 14 वर्षीय महिला, साईबन कॉलनी येथील 25 वर्षीय तरुण, एसटी कॉलनी येथील 30 वर्षीय महिला, लालतारा हौसिंग येथील 45 वर्षीय पुरुष, मादाड रोड येथील 39 वर्षीय इसम, रंगारगल्ली येथील 19 वर्षीय तरुणी, 85 वर्षीय महिला, इंदिरानगर येथील 49 वर्षीय पुरूष, जनता नगर 25, 59 वर्षीय पुरूष , चंद्रशेखर चौक येथील 22 वर्षीय तरुणी असे पंधरा जणांना बाधा झाली आहे तर तालुक्यातील कौठे धांदरफळ येथील 34 वर्षीय इसम, 55, 32, 57 वर्षीय महिला, 11, 8, 9 व 7 वर्षीय बालक, घुलेवाडी येथील 33 वर्षीय महिला, मंगळापूर येथील 11 वर्षीय बालिका, रायते येथील 41 वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथील 18 वर्षीय तरुणी, 15 वर्षीय मुलगा, दाढ खुर्द येथील 26 व 48 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 63 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, रहिमपुर येथील 27 वर्षीय तरुण व 05 वर्षीय बालक, कुरकूटवाडी येथील 80 वर्षीय वृद्ध, माळवाडी येथील 70 वर्षीय वृद्ध , 21 वर्षीय तरुण, कौठे बुद्रुक येथील 55, 54 वर्षीय पुरुष, रायतेवाडी येथील 65 वर्षीय महिला व 52 वर्षीय पुरुष, चोरकोठे येथील 67 वर्षीय महिला, कौठे कमळेश्वर येथील 26 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 62 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथील 40, 40वर्षीय पुरुष, 58, 41वर्षीय महिला, गोल्डन सिटी गुंजाळवाडी येथील 41, 35 व 15 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगा, 69 वर्षीय वृद्ध, निमोण येथील 65 व 22 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, वाघापूर येथील 48 वर्षीय महिला व 50 वर्षीय पुरुष, केळेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथील 80 वर्षीय वृध्दा, वडगाव पान येथील 33, 38 वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथील 45, 52वर्षीय महिला, हिवरगाव पठार 55 वर्षीय पुरुष, खराडी 28 वर्षीय तरुण असे एकूण 51 जणांना बाधा झाली आहे. त्यामुळे आजची एकूण संख्या 66 झाली आहे.